लाडक्या बहिणीं ना जुलै अखेर अनुदान पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता.
एस.के.24 तास
मुंबई : गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजनेचे संपूर्ण वर्षाचे १२ लाभ दिले गेले आहेत. या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही.हा लाभ या महिना अखेर पर्यंत अथवा पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळेल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लाडक्या बहिणींचे हे एक प्रकारे मासिक वेतन आहे. ते महिनाअखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत देण्याचे नियोजन केले जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात लाडकी बहीण योजना सुरू केली.
त्याला जूनमध्ये एक वर्षे पूर्ण झाले.पहिले अनुदान राज्यातील दोन कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना देण्यात आले. त्यानंतर ही संख्या कमी अधिक होत गेली.दहा लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरविल्यानंतर ही संख्या दोन कोटी ४७ लाख बहिणींवर स्थिरावली आहे.
निकषात न बसणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून गरीब, गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश महिला विकास विभागाला देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे ही यादी तयार केली जात आहे.