वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,31/05/2025 ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी पासून तीन की.मी.अंतरावरील मौजा नवेगाव खुर्द येथील रहिवासी जयपाल लक्ष्मण उईके वय,46 वर्ष हे नवेगाव येथे गाव गुराखी असल्याने ते नियमित नियत वनक्षेत्र लगतच्या रामपुरी जंगल शिवारात कक्ष क्रमांक,154 येथे गायी राखत असतांना अचानक एका मोठ्या घनदाट झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला केला.
या केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.सदर घटना दुपारी 1:00 वा.दरम्यान घडली.या आधी दोन वर्षा पूर्वी याच रामपुरी जंगल शिवारात वाघाने हल्ला करून त्यांना जखमी केले होते.नशीब बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून वाचले परंतु काही प्रमाणात शरीरावर जखमा होत्या.जखमीला उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी जयपाल उइके यांच्या पोटाच्या आतडया बाहेर निघाल्या असून पाटीला व हाताला आणि मानेला जबर वाघाचा मार असल्यामुळे आणि येथील रुग्णालयात उपचार होत नसल्यामुळे नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दुपारी 4:00. वाजता हलविण्यात आले.