सिरोंचा येथे राष्ट्रवादी (श.प.) चे नगरसेवक अजित पवार गटात ; पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार,धर्मरावबाबा आत्राम यांनी नगरसेवकांना पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत केले.

 

सिरोंचा येथे राष्ट्रवादी (श.प.) चे नगरसेवक अजित पवार गटात ; पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार,धर्मरावबाबा आत्राम यांनी  नगरसेवकांना पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत केले.


एस.के.24 तास


सिरोंचा : येथील नगर पंचायतमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) गोटात असलेल्या नगरसेविकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. या निर्णयामुळे पक्षांतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रवेशामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाची प्रमुख भूमिका होती. धर्मरावबाबांनी त्या नगरसेवकांना पक्षाचे दुपट्टे घालून त्यांचे स्वागत केले.


या राजकीय बदलामध्ये नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा आणि जगदीश रालाबंडीवार यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली आहे. त्यांच्याच प्रयत्नातून हे मोठे बदल घडल्याचे बोलले जात आहे.

या प्रवेश सोहळ्यात सपना समय्या तोकला आणि महेश्वरी संजय पेद्दापेल्ली या नगरसेविका व समय्या तोकला, अध्यक्ष, वाल्मिकी सहकारी मत्स्य व्यवसाय संस्था, तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय पेदापल्ली यांनी पक्षप्रवेश केला. याप्रसंगी नगरसेवक राजेश बंदेला, जानमपल्लीचे उपसरपंच नागराज गणपती प्रामुख्याने उपस्थित होते. या संपूर्ण घडामोडींमुळे सिरोंचात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आगामी नगर पंचायत निवडणुकीवर त्याचा थेट प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !