ब्रम्हपुरी महापारेषण ऊपविज केंद्रात निराधार व्यक्तीस वस्त्रदान.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,09/08/2025 132 KV महापारेषण उपकेंद्र ब्रह्मपुरी येथे सौ प्रज्ञा रामटेके,डी.वाय.मॅडम व सहकारी कर्मचारी यांनी अनाथ वयोवृद्ध परावलंबी निराधार व्यक्ती श्री.बाबुराव लोखंडे यांना वस्त्र भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
या कार्यक्रमाप्रसंगी सौ निशा डांगे मोहम्मद जमीर शेख श्री नरेश देवढगले उपस्थित होते.बाबुरावजी लोखंडे यांनी महापारेषण कर्मचाऱ्यांनी केलेला सन्मान पाहून मन भारावून गेले आणि डोळ्यातुन आनंदाश्रू वाहू लागले. लोखंडे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले.