ताडाळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

ताडाळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ताडाळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना सहज, मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


हा कार्यक्रम धारिवालचे मुख्य महाप्रबंधक मा. श्री. देवेश कुमार  यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात मा. डॉ. अनिश नायर (मुख्य व्यवस्थापक, धारिवाल), मा. डॉ. रूपेश वैरागडे (धारिवाल)


व मा. श्री. निखिलेश चामरे (उपसरपंच, ताडाळी), मा. अर्चना मोहितकर (सचिव पहेल मल्टिपर्पज सोसायटी चंद्रपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमात एकूण 60 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून औषधोपचाराचा लाभ घेतला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिनेश कामतवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष हलगे,पूजा वानखेडे, श्रेया जोगे,साक्षी झरकर, शीतल लोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.या शिबिरामुळे गावकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !