चामोर्शी तालुक्यात रानटी टस्कर हत्तीचा शिरकाव ; हत्तीने गावात प्रवेश केल्याने नागरिकांची धांदल.
एस.के.24 तास
चामोर्शी : एक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुमाकुळ सुरू होता.चामोर्शी तालुक्यात शिरकाव नव्हता.दोन दिवसांपूर्वी कुनघाडा जवळील लसनपेठ टोला येथे रात्रीच्या सुमारास एका नागरिकाच्या घरात मोहफुलचा वास आल्याने टस्कर हत्तींनी धुमाकुळ घालत घरात ठेवलेल्या धानाची नासधूस केली.
चामोर्शी,घोट व मार्कंडा कं.वनपथक सतर्क : -
निमरड टोला,अनंतपूर,कुदरसी टोला जंगमकुरुड,या परिसरातून भ्रमण करत राजूर मध्ये घराची नासधूस करत पेटतळा,श्यानगर, नारायणपूर मार्गे विष्णुपुर मारोडा जंगल परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती चामोर्शी वनविभागाकडून मिळाली आहे. चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रातील लसनपेठ टोला येथे २९ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास बंडू राठोड यांच्या घरी हत्तीने प्रवेश करत घरी ठेवण्यात आलेले मोहा व पोत्यात ठेवलेले धान फस्त केले.
हा थरार नागरिकांनी अनुभवला. त्यानंतर हत्तींनी चामोर्शी वनपरिक्षेत्रात बुधवारी भाडभिडी उपवनक्षेत्रातील प्रवेश करत अनंतपूर गावात तसेच राजूर शेतशिवारात प्रवेश केला. यामुळे दोन्ही गावांतील नागरिकांनी अख्खी रात्र दहशतीत काढली.नंतर निमरड टोला,अनंतपूर, कुदरसी टोला,जंगमकुरुड, नारायणपूरच्या जंगल परिसरात हत्तीचा संचार होता.
काल जंगम कुरुड येथील शाळेच्या बाजूने नहर जवळून राजूर येथे दाखल होत. यांच्या दोन घराची नासधूस केली.त्यानंतर राजूर मार्गे पहाटे जंगलातून पेटतळा मार्गे श्याम नगर, नारायणपूर, येथे मुक्काम केल्याची माहिती समोर आली असून त्यानंतर नारायणपूर, विष्णुपुर मारोडा जंगल परिसरात वास्तव्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
हत्तीने गावात प्रवेश केल्याने नागरिकांची धांदल : -
पावसाची रिपरिप सुरू लसनपेठ टोला येथे टस्कर हत्ती आल्याचे माहीत होताच अनेक नागरिकांनी छतावर आश्रय घेतला. अनेकांनी आपापल्या घराचे दरवाजे चांगले घट्ट असतानाच हत्तीने गावात प्रवेश केल्याने नागरिकांची धांदल उडाली.
अनंतपुरात हीच स्थिती पाहायला मिळाली.दरम्यान कालच गडचिरोली वन पथकाची टीम दाखल होत ड्रोन कॅमेराद्वारे त्या हत्तीचा शोध घेतला असता कॅमेरात कैद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्तीच्या बंदोबस्तासाठी चामोर्शी वनपरिक्षेत्रधिकारी आर.बी.ईनवते यांच्या मार्गदर्शनात
भाडभिडी क्षेत्रसहाय्यक,व्ही.येस.चांदेकर, चामोर्शी चे क्षेत्रसहाय्यक सलीम कुरेशी,जामगिरीचे क्षेत्रसाय्यक,भारत राठोड,घोट चे वनपरिक्षेत्रधिकारी वाडीघरे,मार्कंडा कं.च्या तनुजा मोढळे तर कुनघाडा रै.चे वनपरिक्षेत्रधिकारी मधुमती तावाडे यांच्या मार्गदर्शनात त्यांचे क्षेत्रसहायक, वनरक्षक,पथक सतर्क झाले आहेत.