गडचिरोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे परिवर्तनाच्या विचारांची नव्याने जपणूक करून यांना विनम्र अभिवादन.

गडचिरोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे परिवर्तनाच्या विचारांची नव्याने जपणूक करून यांना विनम्र अभिवादन.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी, शुक्रवारला गांधी चौक येथील विश्राम भवन गडचिरोली येथे समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, गडचिरोलीच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नामवंत सामाजिक कार्यकर्ते मान. लक्ष्मण मोहूर्ले यांनी भूषविले. या कार्यक्रमात सामाजिक न्यायाच्या लढ्यात सक्रिय असलेले मान.देवाजी लाटकर,अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार प्राप्त मान.ज्ञानेश्वर पायघन यांची विशेष उपस्थिती लाभली.

याशिवाय संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय देवतळे, चिव किशोर नरूले,सह सचिव संदीप येनगंटीवार, संतोष कोपुलवार तसेच संघटनेचे इतर कार्यकर्ते, युवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या साहित्य व समाज परिवर्तनासाठीच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !