स्मशान भूमीतील टीनाचे शेड मरणासन्न अवस्थेत उभे.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,०४/०८/२५ तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील पिंपळगाव रोडवर गावालगत असलेले स्मशानभूमीतील टीनाचे शेडवरिल टीनाचे पत्रे बऱ्याच वर्षापासून वादळाने उडलेली आहेत.सदर स्मशानभूमीत प्रेताला अग्नी देण्यासाठी योग्य ओट्याची, शेडची उपलब्धता नसल्यामुळे आणि स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा रिकामी दिसत नाही म्हणून गावकऱ्यांना प्रेताचे दफन विधी किंवा अग्नि देण्यासाठी अंदाजे ०४ किलोमीटर वैनगंगा नदीवर मोठा त्रास सहन करून न्यावे लागते.
स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य असण्याचे मुख्य कारण म्हणजे सभोवताल संरक्षण भिंत नाही.तरी अ-हेरनवरगांव येथील स्मशानभूमीत सिमेंट काँक्रीट चा शेड बांधून, स्मशानभूमीला चारही बाजूने संरक्षण भिंत आणि गावकरी तसेच बाहेरून येणाऱ्या अंतयात्रेत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना अंत्यविधी उरके पर्यंत विश्रांती घेण्यासाठी एक हालचे बांधकाम उपलब्ध करून गावकऱ्यांची होणारी गैरसोय प्रशासनाने टाळावी.जेणेकरून गावकऱ्यांना प्रेत कमालीचा त्रास सहन करून वैनगंगा नदी वरती न्यावे लागणार नाही.