पत संस्था ही कर्मचा-यांकरिता सुरक्षा कवच. - डॉ.सुभाष शेकोकर यांचे ४८ व्या वार्षिक आमसभेतील मार्गदर्शन करतांना मत व्यक्त.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : पत संस्था कर्मचारी बांधवांसाठी खुप मोठी आधार आहे. कारण अगदी पटकन गरजेनुसार लागणारा पत हा पत संस्थेव्दारा उपलब्ध होत असतो.हेच पत एखाद्या बँकेकडून घेतांना सतरा प्रकारचे कागदोपत्रे जमा करणे यात खुप संघर्ष करावे लागते.
त्यात वेळ जात असते. त्याऐवजी आपली पत संस्था असली तर एकाच दिवसात कर्जाचे अर्ज करुन तेवढा पत उपलब्ध करता येते त्यामुळे पतसंस्था ही ख-या अर्थाने कर्मचाऱ्यांची सुरक्षा कवच म्हणून काम करते असे मत ४८ व्या वार्षिक आमसभा नेवजाबाई हितकारिणी सेवकांची पत संस्था ब्रम्हपुरी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ सुभाष शेकोकर यांनी व्यक्त केले.
यावेळी विचार पीठावर उपस्थित नेवजाबाई हितकारिणी सेवकांची पत संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रकाश वट्टी, उपाध्यक्ष डॉ राहुल मोहुर्ले ,सचिव आलोक मेश्राम संचालक मंडळ सर्वश्री डॉ मोहन कापगते, डॉ सुनिल चौधरी, डॉ युवराज मेश्राम, प्रा बालाजी दमकोंडवार, प्रा अभिमन्यू पवार , श्री राजु मेश्राम, श्री विनय भागडकर, श्री जयंत महाजन व कु.प्रज्ञा मेश्राम इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ प्रकाश वट्टी यांनी आपली पत संस्था ही प्रगती वाटेवर आहे श्रेणी अ गटात स्थान प्राप्त केली आहे. तसेच आमसभेत चर्चा केलेल्या प्रश्नावर विचार करुन प्रस्ताव निबंधक कार्यालयात सादर करुन येणाऱ्या काळात संचालक मंडळ सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असे आमसभेत आश्वासन दिले. या सभेला शंभर टक्के सभासद उपस्थित होते. यात डॉ भास्कर लेनगुरे , डॉ असलम शेख , दिनेश आत्राम, शशिकांत माडे यांनी ठेवीची मर्यादा वाढविण्याबाबत मागणी केली.
तर डॉ.मिलिंद पठाडे यांनी संचालक मंडळ हे यशस्वीपणे काम करित असल्याने अभिनंदनाचा ठराव मांडला. या वार्षिक आमसभेच्या सुरुवातीला देशातील शहिदांना तसेच साहित्यिक, संशोधक, समाजसेवक व कलावंत ज्यांचे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. व सभेला प्रारंभ करण्यात आले.पत संस्थेच्या सन्माननीय पाल्यांचा सत्कार करण्यात आले.
सदर याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक डॉ मोहन कापगते यांनी केले तर आभार डॉ राहूल मोहुर्ले यांनी आभार मानले. सभा यशस्वी करिता श्री राजु ढोरे व सर्व संचालक मंडळ आणि विजु प्रकाश यांनी सहकार्य केले.