अवैधरित्या विक्री करीता साठवणूक केलेली विदेशी मद्यसाठा एकूण 14,47,680/- रुपयांचा विदेशी मद्याचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त.
एस.के.24 तास
सिरोंचा : (दि.28/09/2025 रविवार) गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते.त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्या अंकुश लावण्याबाबत आदेश दिलेले आहेत.
काल दिनांक 27/09/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, उपपोस्टे बामणी हद्दीतील मौजा जाफराबाद ता.सिरोंचा जि.गडचिरोली येथील इसम नामे संदिप देवाजी दुर्गम याने मौजा जाफराबाद येथे विक्री करीता अवैधरित्या विदेशी दारुची साठवणूक करुन ठेवलेली आहे.
मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा,गडचिरोली येथील पोलीस पथकाने दोन पंचासमक्ष गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळालेल्या ठिकाणी धाड टाकली असता,एका घराची पंचासमक्ष झडती घेत असताना आरोपी संदिप देवाजी दुर्गम याने पोलीस पथकास पाहून घटनास्थळावरुन पळ काढला.
पोलीसांनी सदर घराची झडती घेतली असता, घराच्या दुसया खोलीमध्ये 1) 90 मिली क्षमतेची ऑफीसर चॉईस कंपनीचे सिलबंद बॉटलचे 11,136 नग, प्रति नग अवैध विक्री किंमत अंदाजे 130 रु. प्रमाणे एकूण 14,47,680/- (अक्षरी चौदा लाख सत्तेचाळीस हजार सहाशे एैंशी रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त केला आहे.
संबंधीत घटनेच्या अनुषंगाने उपपोस्टे बामणी येथे कलम 65 (ई) महा.दा.का. अन्वये आरोपी नामे संदिप देवाजी दुर्गम रा.जाफराबाद, ता.सिरोंचा जि. गडचिरोली याचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर फरार आरोपीचा शोध घेणे सुरु असून, गुन्ह्राचा पुढील तपास उपपोस्टे बामणी येथील पोउपनि.शाहु दंडे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक,अहेरी श्री.सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.गोकुल राज जी. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली चे पोलीस निरीक्षक श्री.अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विकास चव्हाण, पोहवा/प्रेमानंद नंदेश्वर, पोअं/निशिकांत अलोने, चापोअं/गणेश वाकडोपवार यांनी पार पाडली.