26 व्या राज्य स्तरीय जलतरण स्पर्धेत ब्रह्मपुरीच्या जलतरणपटूंची यशस्वी कामगिरी एकूण आठ पदकांची कमाई.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : महाराष्ट्र स्टेट वेटरंस एक्वॅटिक असोसिएशन आणि मास्टर्स एक्वॅटिक असोसिएशन छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा २०२५ चे आयोजन दिनांक १३ व १४ सप्टेंबर ला सिद्धार्थ जलतरण तलाव छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आली.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यांतील एकूण ३५० जलतरणपटू सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यातून ब्रह्मपुरी येथील शिवराज मालवी, प्रशांत मत्ते, स्पार्टाकस शेंडे, प्रीतम राऊत, पराग राऊत, सतीश मेश्राम यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत सहभाग घेतला व राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण आठ पदकांची यशस्वी कमाई करत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ब्रह्मपुरीचे नाव रोशन केले.
शिवराज मालवी यांनी ६० ते ६४ वयोगटात ५० मी. फ्रिस्टाईल मध्ये गोल्ड मेडल,१०० मी.फ्रिस्टाईल मध्ये सिल्व्हर मेडल, २०० मी. फ्रिस्टाईल मध्ये ब्राॅंझ मेडल तर १०० मी. बॅकस्ट्रोक मध्ये ब्राॅंझ मेडल असे एकुण चार मेडल्स प्राप्त केले.
स्पार्टाकस शेंडे यांनी ४० ते ४४ या वयोगटात ५० मी. बटरफ्लाय मध्ये ब्राॅंझ मेडल, २५ ते २९ या वयोगटात प्रितम राऊत यांनी ५० मी. बॅकस्ट्रोक मध्ये सिल्व्हर मेडल, ३०ते ३४ या वयोगटात पराग राऊत यांनी ५० मी. बटरफ्लाय मध्ये गोल्ड मेडल, ५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले, असे ब्रह्मपुरीच्या जलतरण पटुंनी एकुण ०८ मेडल्स प्राप्त करत नेत्रदीपक यश संपादन करत ब्रह्मपुरी चे नाव रोशन केले.
याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व मित्रमंडळी नी जलतरण पटुंचे अभिनंदन केले आहे तसेच पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.