ब्रम्हपुरी तालुक्यातील सायगाटा च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,17/09/2025 ब्रम्हपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सायगाटा हनुमान मंदिरब्रम्हपुरी वनपरीक्षेत्रातील उत्तर उपक्षेत्र ब्रम्हपुरी, नियतक्षेत्र सायगाटा भागात मंगळवारी (दि.16 सप्टेंबर) सायंकाळी सुमारे 4:30 वा.वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी ठार झाल्याची घटना उघडकीस आली.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील ऊर्फ प्रमोद बाळकृष्ण राऊत वय,32 वर्ष मुक्काम लाखापूर असे आहे. नेहमीप्रमाणे लाखापूरच्या जंगलात प्रमोद गुरे चारण्यासाठी गेला होता. गुरे चारून परत येत असताना झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.या भीषण हल्ल्यात सुनील राऊतचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेनंतर लाखापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ब्रह्मपुरी वनाधिकारी व वनविभाग कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही साठी तपास सुरू आहे.