जिल्हा परिषदेचे भोंगळ कारभार, राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या कामगारांना वर्ष उलटूनही नियुक्ती आदेशच नाहीत.
📍नियुक्ती आदेशासाठी बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात कामगार धडकले जि.प.सीईओच्या दालणात.
एस.के.24 तास
गडचिरोली : ओझोन कंपनी च्या वतिने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्या सारख्या संवेदनशील क्षेत्रात काम करणा-या विविध संवर्गातील कामगारांना वर्ष उलटूनही नियुक्ती आदेशच मिळाले नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात.
जिल्ह्यातील शेकडो कामगारांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय गाठत सीईओनाच रामभरोसे असणारे हे कर्मचारी नेमके कोणाचे कामगार आहेत? या कामगारांनी आपल्या समस्या नेमके मांडायचे कोणाकडे? यांचा वाली कोण? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करत सीईओ गाडे यांना भांबावून सोडले.
आरोग्याच्या संवेदनशील क्षेत्रात जिल्ह्यात शेकडो कामगार सेवा देत आहेत परंतु त्यांच्या समस्यांकडे प्रशासनच कंपनीशी संगनमत करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष व हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप वंचितच्या पदाधिका-यांनी करत कामगारांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावे अशी मागणी रेटून धरली.
सिईओ गाडे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले की, कामगारांच्या सर्व समस्यांची संबंंधितांकडून माहिती घेऊन पूर्तता करण्यासाठी किमान एक आठवड्याचा वेळ लागेल. येणा-या एक आठवड्यात सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे.
कामगारांच्या होत असलेल्या पिळवणूकीला जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याने कोणत्याही परिस्थितीत कामगारांची पिळवणूक खपवून घेतल्या जाणार नाही एक आठवड्यात कामगारांच्या समस्या सोडवा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशाराही बाळू टेंभुर्णे यांनी दिला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते जी. के. बारसिंगे, कवडू दुधे,तुळशिराम हजारे,भोजराज रामटेके, विलास केळझरकर,राजू डेंगरे,संजय मेश्राम, अरविंद जेंगठे,सुभाष भोयर, ज्योती कावळे, वैशाली सालोटकर, योगेश गोहने, मनिषा बोबडे,मनिषा मेश्राम, वंदना मस्के, पोर्णिमा डोंगरे, जास्वंदा मेश्राम, सुक्ष्मा खोब्रागडे आदिसहीत शेकडो कामगार उपस्थित होते.