" समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना " तर्फे प्रेरणादायी शिक्षक दिन कार्यकम संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज महापुरुषांना अभिवादन करून दिवस साजरा करण्यात आला. समाज परिवर्तनाचे खरे शिक्षक ठरलेल्या या महापुरुषांच्या कार्याचा स्मरण करून त्यांच्या पाऊलखुणांवर चालण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये समाजातील शिक्षणाचे महत्त्व, तरुण पिढीने घ्यावयाचे आदर्श आणि शिक्षकांनी घडवलेले संस्कार याबद्दल विचार मांडले. "महापुरुषांच्या विचारांमध्येच खऱ्या शिक्षक दिनाचा संदेश दडलेला आहे," असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.या उत्साहपूर्ण कार्यक्रमामुळे शिक्षक दिनाला सामाजिक आणि प्रेरणादायी अशी नवी दिशा लाभली.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहूर्ले, समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनाच्या महिला प्रदेश अध्यक्ष माया मोहूर्ले,उपाध्यक्ष विजय देवतळे, सचिव किशोर नरुले, सहसचिव संदीप येनगंटीवार यांच्यासह अन्य मान्यवर रामदास देवतळे, प्रेमाला वासेकर, कमलताई देवतळे, सुमनताई, मोहुर्ले उपस्थित होते.

