चामोर्शी शहरासाठी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी द्या. - शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका गटप्रमुख सुरज नैताम यांची मागणी.
एस.के.24 तास
चामोर्शी : गेल्या काही महिन्यापासून येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचे स्थानांतर झाल्यामुळे येथील रिक्त पदावर मार्कंडा देव येथील तलाठी चंदनखेडे साहेब यांचेकडे प्रभार दिला मात्र त्यांना दोन्ही कडील सामान्य माणसाची काम करतांना कसरत करावी लागत आहे.
बऱ्याच नागरिकांना कागदपत्रे मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी येथे स्वतंत्र तलाठी द्यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष तालुका चामोर्शी गटप्रमुख सुरज नैताम यांनी मागणी केली आहे.
चामोर्शी येथील ग्राम महसूल अधिकारी मेश्राम यांची बदली झाल्याने त्यांचे रिक्त जागी नव्याने तलाठी न देता मार्कंडा देव येथील चंदनखेडे यांचेकडे प्रभार देण्यात आले असून त्यांना दोन्ही ठिकाणचे काम करतांना दमछाक होत असून हे शहर तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून तलाठ्याना गावाची पीक पाहणी करणे.
जमिनीच्या नोंदी ठेवणे,शासनाचे विविध आदेश आणि निर्णय गाव पातळीवर पोहोचवणे, लोकांना मदत करणे आणि शासनासाठी गाव पातळीवर काम करणे,समाविष्ट असून तलाठी गावातील जमिनीच्या नोंद,पिकांच्या नोंदीनी आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे अद्ययावत ठेवने ल.
शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून तलाठी शासनाचे परिपत्रक सूचना आणि निर्णय गावकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि गावकऱ्यांच्य समस्या शासनापर्यंत पोहोचवन्याचे काम असून गावातील विविध कर आणि सिंचन देणे गोळा करण्याचे काम तलाठी करत असतो.
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा वेळोवेळी उत्पन्न व रहिवाशी दाखला, तर शेतकऱ्यांना सात बारा, सह विविध प्रकारचे कामे वेळोवेळी करावे लागतात मात्र स्वंतत्र ग्राम महसूल अधिकारी न देता प्रभारी अधिकारी देण्यात आले आहे त्यासाठी चामोर्शी ला स्वंतत्र तलाठी देण्यात यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष तालुका चामोर्शी गट प्रमुख सुरज नैताम चामोर्शी यांनी केली आहे.

