जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल बेले यांची प्रा.आ.केंद्र रोहना येथे आकस्मिक भेट.
एस.के.24 तास
वर्धा : शनिवारी प्रा.आ.केंद्र,रोहना येथे पंधरवडी सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले यांनी आकस्मिक भेट देऊन सर्व राष्ट्रीय कार्यक्रम अभियान ,मोहीम,स्वच्छता,बांधकाम पाहणी करून, इतर सर्व बाबीचा कर्मचारी निहाय आढावा घेतला तसेच १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला लसीकरण मोहीम चे योग्य प्रकारे नियोजन करून मोहीम यशस्वी करावे.
एकही लाभार्थी सुटणार नाही अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या, स्वस्थ नारी,सशक्त परिवार ही मोहीम सर्व आरोग्य संस्था व उपकेंद्र स्तरावर राबवायची असून यामध्ये लोकप्रतिनिधीचा जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, सर्व आरोग्य कर्मचारी यांनी राष्ट्रीय कुटुंब नियोजनाचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करावे, आरोग्य कर्मचारी यांनी नियमित गृहभेटी देऊन कुठे साथरोग व कीटकजन्य आजार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी.
कार्यक्षेत्रात प्रभावीपणे आरोग्य विषयक जनजागृती करावी, सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक ऑनलाइन डाटा एन्ट्री नियमित करण्यात याव्या, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून आरोग्य विषयक सेवा द्याव्या. तीन महिने पुरेल इतका औषधी साठा सर्व आरोग्य संस्थांनी उपलब्ध करून ठेवावा,अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
त्यावेळी सभेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेंद्र वर्मा,वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रेया डंभारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.रुचिरा पाटील,तालुका आरोग्य सहाय्यक अविनाश चव्हाण,व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील,सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य साहायिका आरोग्य सेविका,आरोग्य कर्मचारी हजर होते.