सावली तालुक्यातील पाथरी येथील शेतकरी वाघाचा हल्ल्यात ठार.

सावली तालुक्यातील पाथरी येथील शेतकरी वाघाचा हल्ल्यात ठार.


एस.के.24 तास


सावली : सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पाथरी उपवन क्षेत्रातील असोला मेंढा नहराला लागून असलेल्या शेतात निंदण करीत असलेल्या शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे.


सदर घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे.पाथरी येथील पांडुरंग भिकाजी चचाने वय,75 वर्ष हे शेतकरी आपल्या विरखल रोड लगत असलेल्या असोला मेंढा नहराला लागून असलेल्या शेतात सकाळी निंदनचे काम करीत असतानाच  वाघाने सदर शेतकऱ्याला हल्ला करून ठार केल्याची खळबळ जनक घटना घडलेली आहे. 


सदर घटनेची माहिती वन परिक्षेत्र विभागाला व पोलीस विभागाला देण्यात आलेली आहे.परिसरात वाघीनेने पिलांना जन्म दिल्याची माहिती मिळत असून विरखल परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


ऐन शेतीच्या हंगामात वाघाचा धुमाकूळ सुरू झाल्याने शेतकरी भयभीत झाल्याने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !