क्रिडा स्पर्धेत लोकमान्य टिळक विदयालय,ब्रम्हपुरी येथील विदयार्थ्यांचे सुयश.

क्रिडा स्पर्धेत लोकमान्य टिळक विदयालय,ब्रम्हपुरी येथील विदयार्थ्यांचे सुयश.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दि.१२,१३/२५या दोन दिवसापूर्वी ब्रह्मपुरी येथे झालेल्या तालुका क्रीडा मैदानी स्पर्धेत लोकमान्य टिळक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.त्यात 400 मी.रनिंग स्पर्धेत 17 वर्ष वयोगटामध्ये नकुल गणेश चिंचूलकर तसेच तन्मय कवडू पिंपळकर या विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.

 

तसेच हितेश प्रशांत मेश्राम या विद्यार्थ्याने 110 मी. हर्डल स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 400 मीटर हर्डल स्पर्धेत नकुल गणेश चिंचुलकर या विद्यार्थ्याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला . 


लावण्य प्रशांत मेश्राम या विद्यार्थ्याने 100 मी रनिंग स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. 


19 वर्षे वयोगटाखाली विद्यार्थिनी समीक्षा धांडे या विद्यार्थिनींनी 100 व 200 मीटर रनिंग स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला.


 श्रेया शशांक नानोटी या विद्यार्थ्यांनी ने 3 किलोमीटर चालणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.


19 वर्ष वयोगटातील विद्यार्थी प्रणय गणेश उपासे या विद्यार्थ्याने 800 मी 1500 मी. रनिंग प्रथम क्रमांक पटकाविला.5000 मी. रनिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला 


वेदांत रवींद्र कामडी या विद्यार्थ्याने देखील 19 वर्ष वयोगटाखालील मैदानी स्पर्धेत 5000 मी. 1500 मी. क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.


सांघिक क्रीडा 4100 रिले स्पर्धेत ,4400 रिले स्पर्धेत 17 वर्ष वयोगटाखालील विद्यार्थी लावण्य प्रशांत मेश्राम ,नकुल गणेश गणेश चिंचुलकर, तन्मय कवडु पिंपळकर चंद्रकांत दिवाकर कावळे या विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.


 त्याचप्रमाणें दि 13/9/25 शनिवार ला चंद्रपूर क्रिडा संकुल या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत विद्यालयातील वर्ग 6 वीची विद्यार्थिनी आरोही देवांग तसेच वर्ग 10 ची विद्यार्थीनी अमृता ठाकरे व वर्ग 10 चा विद्यार्थी कृष्णा भुपाल या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर किक बॉक्सिंग स्पर्धेत प्राविण्य मिळवत त्यांची विभाग स्तरावर गोंदिया या ठिकाणी होणाऱ्या विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.


 या भरघोस यशाने या सर्व विद्यार्थ्यांची तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्याबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेन व शाळा परिवारातर्फे विजेत्या स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !