आदिवासी आश्रम शाळेतील अधीक्षिका आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीं कडून घरगुती कामे करून घेतल्या प्रकरणी निलंबित.
एस.के.24 तास
नागपूर : सावनेर च्या सावळी येथील विद्याभारती आदिवासी आश्रमशाळेतील अधीक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींकडून घरगुती कामे करून घेण्याचा आरोप त्यांच्यावर होता.याबाबत तक्रारीनंतर अपर आदिवासी आयुक्तांनी त्यांना निलंबित केले आहे.
सोनाली दुपारे असे निलंबित अधीक्षिकेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थिनींकडून स्वतःच्या घरची भांडी धुऊन घेणे, कपडे धुऊन घेणे व साफसफाई करून घेणे.
या प्रकारची कामे त्या करून घेत, याबाबत माहिती मिळाल्यानंतर भाजप जनजाती आघाडीचे शहर अध्यक्ष आकाश मडावी यांनी संबंधित अधीक्षिकेची अपर आदिवासी आयुक्त आयुषी सिंह आणि प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांच्याकडे तक्रार करीत तत्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
या शिष्टमंडळात महामंत्री रोहित कुंभरे,ललित मडावी, अनिकेत कुंबरे, मौसमी परतेकी,सागर इवनाते,देव मरसकोल्हे,राकेश गडपल्लीवर,आशिष मसराम,स्वप्निल वलके,प्रतीक महाती,मनीष सय्याम,अमित मरापे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

