दोघे भाऊ शेतातून फवारणी करून घराकडे येताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू ; एकाचा रुग्णालयात मृत्यू.
📍गडचिरोली शहरापासून 1 कि.म.अंतरावर आरमोरी मार्गावर घडली घटना.
एस.के.24 तास
गडचिरोली : मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना गडचिरोली शहरापासून एक किलोमीटर अंतरावर आरमोरी मार्गावर घडली आहे.या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतात पीक फवारणीसाठी गेल्यानंतर दुचाकीने घराकडे परत येत असताना मालवाहू ट्रकने धडक दिल्याने सख्खे भाऊ जागीच ठार झाले आहेत.पुरुषोत्तम बारसागडे आणि अंकुश बारसागडे अशी मृतांची नावे आहेत.
गडचिरोली शहरातील हनुमान वार्ड प्रभागातील रहिवाशी होते. दोघे भाऊ फवारणीसाठी शेतात गेल्यानंतर घराकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
त्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला.तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव निर्माण झाला होता.पोलिसांनी वेळीच सावधानता बाळगल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.