कान्पा येथे महिलेला नोकरीचे आमिष दाखवून 5 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करणार्या एका तोतया पत्रकाराला नागभीड पोलिसांनी केली अटक.
एस.के.24 तास
नागभीड : जिल्ह्यात महिलांना नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणार्या एका पत्रकाराला नागभीड पोलिसांनी 8 ऑक्टोबर ला अटक केली.राजेंद्र विनोद मेश्राम 39 रा.जामगाव बु.ता.वरोडा असे तोतया पत्रकाराचे नाव आहे.
याबाबती तक्रार भारती फुलचंद फाले वय,34 वर्ष रा.कान्पा यांनी नागभीड पोलिस ठाण्यात दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की,आरोपी मेश्राम याने " स्वयंभू सनराईज ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था,चंद्रपूर " या संस्थेद्वारे गावागावात " माय इंडिया निधी बँक " च्या शाखा स्थापन केल्या असल्याचे सांगून महिलांचा विश्वास संपादन केला.
भारती फाले यांना एरिया मॅनेजर पदावर नोकरी देतो तसेच इतर महिलांनाही संस्थेत नोकरी मिळवून देतो,असे सांगून त्याने बनावट ऑर्डर तयार केले. ते आर्डर खरे असल्याचे भासवून एकूण 5 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केली.