पद्मश्री डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचा चौदावा वर्धापनदिन साजरा. 📍दिवंगत मारोतराव कांबळे यांना मरणोत्तर जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान.

पद्मश्री डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचा चौदावा वर्धापनदिन साजरा.


📍दिवंगत मारोतराव कांबळे यांना मरणोत्तर जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान.


 अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपुरी : ११/१०/२५ ज्ञानातून विकास यावर विद्यापीठाची महत्त्वाची वाटचाल सुरू असून कला व साहित्याची शिक्षणाला जोड मिळत आहे.या भागातील विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये गोंडवाना विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका आहे.विविध अध्यासानांची निर्मिती ही खूपच अभिमानास्पद बाब असून अध्यासनाच्या कार्यातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक विचारधारा रुजेल.डॉ.बाबा आमटे यांचे अध्यासन सुरू व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . विद्यापीठात राबविले जाणारे विविध प्रकल्प हे समाजोपयोगी असून सामजिक जडण घडणीत विद्यापीठ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 


विद्यापीठ विकासाचा जो प्रयत्न आहे .तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना विद्यापीठ झाल्यामुळे चांगली संधी निर्माण झाली आहे . वैदयकीय क्षेत्रातील रंजक उदाहरणे देऊन शिक्षण क्षेत्रात काय बदल घडू शकतात. हे त्यांनी उदाहरणादाखल समजावून सांगितले. गोंडवाना विद्यापीठात झालेला बदल पाहता इथे सुरू असलेले उपक्रम हे इतर कोणत्याही विद्यापीठात नाही त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात होणाऱ्या विकासाचे मॉडेल जगाने स्वीकारले पाहिजे असे आव्हान नागपूर येथील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले.  

 

गोंडवाना विद्यापीठाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा दि. २ ऑक्टोंबर, २०२५ रोजी, विजयादशमी (दसरा) सण असल्यामुळे सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता गोंडवाना विद्यापीठाचे नविन सांस्कृतिक सभागृह येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. 


या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे, कुलगुरु, डॉ. प्रशान्त बोकारे, आमदार तसेच अधिसभा सदस्य डॉ. मिलिंद नरोटे, या कार्यक्रमात नागपूर येथील प्रसिध्द मेंदू विकार तज्ज्ञ, पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, स्वर्गीय मारोतराव कांबळे यांचे पुत्र प्राचार्य देवेश कांबळे , संस्थापक, अध्यक्ष,ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित डॉ.खत्री महाविद्यालय,तुकूम,चंद्रपूर चे डॉ.नंदकिशोर हरीलाल खत्री हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 


तर प्रमुख उपस्थिती म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता आंतर विद्या शाखा प्रो. प्रगती नरखेडकर , वित्त व लेखा अधिकारी सी. ए. भास्कर पठारे , व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत मोहिते, डॉ.रंजना लाड, गुरूदास कामडी, डॉ.संजय गोरे डॉ.लेमराज लडके, डॉ.विवेक गोर्लावार,प्रशांत दोंतुलवार , डॉ.नंदाजी सातपुते,डॉ.बी.एस.गेडाम आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


या कार्यक्रमात शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते व शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय मारोतराव कांबळे यांना “जीवन साधना गौरव पुरस्कार” मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांचे पुत्र प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संस्थापक, अध्यक्ष, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम चंद्रपूर चे डॉ.नंदकिशोर खत्री यांनाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाचा “ जीवन गौरव साधना पुरस्कार ” प्रदान करण्यात आला.


डॉ.देवेश कांबळे यांनी पुरस्काराची रक्कम विद्यापीठातील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अध्यासन केंद्राच्या कार्यासाठी विद्यापीठास दान केली, तर डॉ. नंदकिशोर खत्री यांनी आपली पारितोषिक रक्कम कृषी तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी दान केली.पद्मश्री डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांच्या परिचय पत्राचे वाचन मराठीच्या विभाग प्रमुख डॉ.सविता सादमवार यांनी केले. 


आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. विद्यापीठ जेव्हा रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करेल, तेव्हा आणखी मोठी प्रगती साध्य करावी लागेल असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या अनेक उपक्रमातून विद्यार्थ्याना जीवनमूल्यांचे शिक्षण मिळत असून असे शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना विविध संस्थांमध्ये नियुक्ती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. हे जीवन शिक्षण विद्यापीठाच्या परिसरात तर आहेच पण संलग्नित महाविद्यालयाच्या परिसरातही ते व्हावे . या विद्यापीठासाठी यापुढेही आम्ही काहीही कमी पडू देणार नाही.अशी मी ग्वाही देतो.


आमदार मिलिंद नरोटे हे मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यापीठातून येथील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य उत्तम रित्या सुरू आहे. या विद्यापीठाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी तसेच विद्यापीठाच्या मदतीसाठी मी मागे पुढे पाहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.प्राचार्य देवेश कांबळे , डॉ. नंदकिशोर हरीलाल खत्री यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले . यांच्या मानपात्राचे वाचन सहा.प्रा.डॉ. हेमराज निखाडे आणि अमोल चव्हाण यांनी केले. 


कार्यक्रमाची सुरुवात डॉ.श्रीराम कावळे यांनी प्रास्ताविक व विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिल्पा अठावले यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी केले. तसेच या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय मारोतराव कांबळे यांचे कुटुंबीय,अधिसभा,व्यवस्थापन परिषद,विद्यापरिषद यांचे सन्माननिय सदस्य आणि विद्यापीठातील विविध प्राधिकरणाचे,मंडळाचे समित्यांचे सदस्य तसेच 


अन्य मान्यवर, विद्यापीठातील संविधानिक अधिकारी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी,विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती . दिवंगत मारोतराव कांबळे यांना मरणोत्तर जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान केल्याबद्दल गोंडवाना विद्यापीठचे कुलगुरू तसेच कुलसचिव यांचे मारोतराव कांबळे यांचा चाहता वर्ग तसेच आंबेडकरी समाजबांधवांकडून आभार व्यक्त केल्या जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !