कुरखेडा येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न.
एस.के.24 तास
कुरखेडा : वंचित बहुजन आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने 11 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता कुरखेडा येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सभा आयोजित करून पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी व नवीन कार्यकर्ते पक्षात समाविष्ट करण्यासाठी नवीन व जुने कार्यकर्ते एकत्रित येऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
कुरखेडा तालुक्यातील नविन कार्यकारिणी गठित करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ जी दुधे वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष सोनलदिप देवतळे, वंचित बहुजन आघाडी महिला प्रतिनिधी उषाताई निमगडे, युवा कार्यकर्ता पीयुष शेडमाके , ताराचंद नंदेश्वर
दिनेश राऊत,किशोर धोंडणे,सदाशिव शेंडे ,मुरलीधर कसारे ,पुणेश वालदे ,हंसराज लाडे,यांची उपस्थिती होती. ॲड श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीत काम केले पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे यांनी केले.