गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने " सायबर जनजागृती सायकल रॅलीचे " आयोजन. 📍केंद्रीय गृह मंत्रालयाच्या " सायबर जनजागृती माह " उपक्रमाअंतर्गत ऑक्टोंबर 2025 या संपूर्ण महिण्यामध्ये करण्यात येणार विविध सायबर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने " सायबर जनजागृती सायकल रॅलीचे " आयोजन.


📍केंद्रीय गृह मंत्रालयाच्या " सायबर जनजागृती माह " उपक्रमाअंतर्गत ऑक्टोंबर 2025 या संपूर्ण महिण्यामध्ये करण्यात येणार विविध सायबर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन.

 

एस.के.24 तास


गडचिरोली : (दि.12/10/2025 रविवार) दिवसेंदिवस सायबर अपराधांचे तसेच इंटरनेट व समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या मार्गदर्शनाखाली, ऑक्टोबर 2025 हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून संपूर्ण देशभरातील सर्व जिल्ह्रामध्ये साजरा करण्यात येत आहे. 


याच उपक्रमांचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 12 ऑक्टोंबर 2025 रोजी ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले.


सदर सायबर जनजागृती सायकल रॅली पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते ट्रेंड्स मॉल, धानोरा रोड येथे आयोजित करण्यात आली. या सायबर जनजागृती सायकल रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांचेसह 300 पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व शेवटी या सायकल रॅलीचा शहिद पांडु आलाम सभागृह येथे समारोप करण्यात आला. 


या सायबर जनजागृती सायकल रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्ह्रांचे प्रमाण देखील वाढत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 


या सोबतच या जनजागृती महिन्यात विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृती मोहिम, ऑनलाईन वेबिनार्स तसेच सोशल मिडियावरील प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे.


सदर सायकल रॅलीप्रसंगी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले आहे की, प्रत्येक नागरिकाने या सायबर जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून सायबर सुरक्षिततेस हातभार लावावा तसेच नागरिकांनी फसवणुकीबाबत सावध राहुन ओटीपी वा वैयक्तिक माहिती सांगू नये व कोणत्याही सायबर फसवणुकीस बळी पडल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930/1945 वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. 


सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे, सायबर पोलीस स्टेशनच्या मपोउपनि.नेहा हांडे तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !