सरन्यायाधीश मा.भुषणजी गवई यांचेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ब्रम्हपुरी तालुका बार असोसिएशन यांचा न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून निषेध.

सरन्यायाधीश मा.भुषणजी गवई यांचेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ब्रम्हपुरी तालुका बार असोसिएशन यांचा न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून निषेध.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१०/१०/२५ दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दि .०६-१०-२०२५ रोजी न्यायालयीन सुनावणीदरम्यान एक माथेफिरू राकेश किशोर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा.भुषणजी गवई यांच्या वर भ्याड हल्ला केला.सदरची घटना ही अतिशय निंदनीय असून संविधानाचा, लोकशाहीचा व न्यायव्यवस्थेचा अवमान असून सदरचा हल्ला हा संविधानिक सर्वोच्च पदावरील सरन्यायाधीश यांच्यावर केलेला असल्याने एकंदरीत लोकशाहीला धोका पोहचविण्याचे कार्य राकेश किशोर यांनी केले आहे.

 


सदरील घटनेच्या निषेधार्थ दिनांक,१०-१०-२०२५ रोजी ब्रम्हपुरी तालुका बार असोसिएशन ब्रम्हपुरी येथील सर्व अधिवक्ता यांनी एक दिवसीय न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याची ठरविले व भ्याड हल्लेखोरावर तातडीने गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्यात यावी या आशयाचे निवेदन माननीय राष्ट्रपती नवी दिल्ली यांना मा.उपविभागीय दंडाधिकारी ब्रम्हपुरी मार्फत निवेदन देण्यात आले..

              

त्याप्रसंगी ॲड. हेमंतभाऊ उरकुडे (अध्यक्ष तालुका बार असोसिएशन ब्रम्हपुरी),ॲड.वामन एन.मैंद (उपाध्यक्ष ), ॲड.अमोल ताराचंद खोब्रागडे, (सचिव तालुका बार असोसिएशन ब्रम्हपुरी, ॲड.प्रकाश टेंभुर्णे (कोषाध्यक्ष),ॲड.साजन एस.निमजे (ग्रंथपाल), ॲड.प्रविण चिंतावार,( सहसचिव), ॲड.राजेशचंद्र दुबे,ॲड.मंगेश मिसार,ॲड.पल्लवी भेदे,ॲड. भाग्यश्री प्रधान,ॲड.राजेश डांगे,ॲड.छबी गोहणे व इतर अधिवक्ता मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !