बछड्याच्या विरहात वाघीण चवताळली धावत्या दुचाकीस्वारावर घातली झडप.
📍दुचाकी स्वाराच्या पायाला दुखापत मूल चंद्रपूर महामार्गावरील केसलाघाट येथील घटना.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : चंद्रपूर - मूल मार्गावरील थरार ; दुचाकी स्वाराच्या पायाला दुखापत मूल चंद्रपूर महामार्गावरील केसलाघाट परिसरात चार दिवसांपासून एकवाघीणबछड्यासह मुख्य मार्ग ओलांडताना धुमाकूळ घालत आहे.शुक्रवारी (दि. २२) दुपारी २ वाजेच्या सुमारास वाघिणीने मूल कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या एका दुचाकीवर धाव घेतल्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
सायंकाळी ६ वाजता याच वाघिणीने धावत्या दुचाकीवर झडप घातल्याने एक जण जखमी झाला. नागेश चंद्रशेखर गायकी वय,52 वर्ष रा.खांबाळा, ता.चिमूर असे जखमीचे नाव आहे. या घटनेने नागरिकांत प्रचंड दहशत पसरली असून, वनविभागाने वाघिणीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
मूल - चंद्रपूर महामार्गावरील केसलाघाट व आगडी गावाच्या मध्यभागी मागील काही दिवसांपासून वाघीण आपल्या बछड्यासह रस्ता ओलांडताना अनेकांना आढळली होती. शुक्रवारी (दि. अज्ञात वाहनाच्या धडकेत केसलाघाट जवळ वन्यप्राण्याचा मृत्यू झाला.मृत वन्यप्राण्याचे अवशेष तपासणीसाठी पाठविले.अहवाल यायचा आहे.हा त्याच वाघिणीचा बछडा असावा,
असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.नागरिकांत पसरली दहशत बछड्याच्या शोधात असलेली वाघीण चवताळून त्याच परिसरात भ्रमण करीत आहे.दुपारी २ वाजेच्या सुमारास वाघीण घटनास्थळापासून रस्ता ओलांडताना दिसली. वाघिणीला बघण्यासाठी रस्त्यावर अनेकांनी वाहने थांबवली होती. वाघिणीने एका दुचाकीकडे धाव घेतल्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
त्यानंतर त्याच परिसरात वाघिणीचा संचार सुरू असल्याची नागरिकांत चर्चा होती.दरम्यान, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चिमूर तालुक्यातील खांबाळा येथील नागेश गायकी हे चंद्रपूर कडून मूल कडे MH.33 AA 3039 क्रमांक च्या दुचाकीने जात होते.वाघिणीने त्याच्यावर हल्ला केल्याने पायाला गंभीर दुखापत झाली.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.जखमीला मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेने नागरिकांत प्रचंड दहशत पसरली आहे.

