राजकीय कार्यातून जनसेवेचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे प्रमोद चिमुरकरांचा सन्मान.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - ०९/११/२५ सांझ विहार इव्हेंट प्रस्तुत दिवाळी स्नेहमिलन संध्या हा कार्यक्रम ब्रह्मपुरीतील झाशी राणी चौक पटांगण येथे उत्साहात पार पडला.मराठी भावगीत, पोवाळा, भक्तीगीते आणि स्नेहमिलनाच्या सुरेल वातावरणात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा या वेळी आयोजित करण्यात आला.या सोहळ्यात राजकीय क्षेत्रात जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहिल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद चिमुरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्वतःचा गौरव झाल्यानंतर त्यांनी “ सामान्य माणूस असतानांही समाजासाठी केलेल्या कामाची दखल घेण्यात आली ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे,” असे मनोगत व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.या कार्यक्रमाच्या उद्घाटिका API शितल खोब्रागडे मॅडम पोलीस स्टेशन, ब्रम्हपुरी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे योगेशभाऊ मिसार,विनोदभाऊ झोडगे, अविनाशभाऊ राऊत, सचिनभाऊ राऊत,मोन्टुभाऊ पिलारे,दिपकभाऊ मेहर, मिलिंदभाऊ भनारे व इतर मान्यवर उपस्थित होते .
चिमुरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “विविध राजकीय पक्षांतील लोकांना एकाच मंचावर आणून एकत्र बसविण्याचे कार्य या कार्यक्रमाने साधले आहे.मतभेदांपेक्षा मनभेद दूर करण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे. आयोजकांचे हे पाऊल समाजातील ऐक्य आणि सौहार्द वाढविणारे आहे,” अशा शब्दांत त्यांनी आयोजकांचा गौरव केला.सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक मान्यवरांचा यावेळेस सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये प्रामुख्याने जनतेला न्याय देणारे मान्यवर पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके यांचा दीर्घ सेवेसाठी, पत्रकार प्रशांत डांगे यांचा पत्रकारितेतील योगदानाबद्दल आणि पत्रकारितेत अल्पावधीत उल्लेखनीय कामगिरी करीत ‘ ब्रह्मपुरी दर्पण ’ सारखे वृत्तपत्र स्थापन करणारे राहुल भोयर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक नरेश गाडगेवार, भूषण रामटेके, राहुल सोनटक्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सांज विहार ने आयोजित दिवाळी स्नेह मिलन संध्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. दिवाळीच्या आनंदी वातावरणात पार पडलेल्या या स्नेहमिलनाने ब्रह्मपुरीत सामाजिक ऐक्य आणि परस्पर सन्मानाचा सुंदर संदेश दिला.



