जि.प.शाळा कळमना येथे व्यवस्थापन समितीचे गठण : आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात कार्यक्रम.

जि.प.शाळा कळमना येथे व्यवस्थापन समितीचे गठण : आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात कार्यक्रम. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : कळमना हे स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधायुक्त आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ही सुंदर शाळा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीची बैठक आदर्श स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.

        

समितीच्या निवड प्रक्रियेत प्रशांत ताजणे यांची अध्यक्षपदी, संगीता बाळकृष्ण उमाटे उपाध्यक्षपदी, तर लोहे सर यांची सचिवपदी निवड करण्यात आली. सदस्य म्हणून कवडु गौरकार, राहुल बल्की, ज्ञानेश्वर वाढरे, छत्रपती गेडाम, नाजुका प्रदीप आत्राम, माधुरी सतीश आबिलकर, प्रियंका संतोष बल्की, जोशना विनोद सिडाम आणि गिर सावळे सर यांची निवड करण्यात आली. 


या प्रसंगी बोलताना सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, कळमना ग्रामस्थांच्या सहभागातून, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या पुढाकाराने शाळेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करीत असून ते लक्ष लवकरच साधण्यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला.

      

या कार्यक्रमास पालक सभेचे अध्यक्ष सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, मुख्याध्यापक लोहे सर, कवडु गौरकार,पांडुरंग क्षिरसागर, श्रावण गेडाम, रामचंद्र कुकुडे, योगराज वाढरे, शंकर फिसके, अनिल मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेदोर सर यांनी केले, निवड प्रक्रिया निमकर सर यांनी पार पाडली, तर आभार प्रदर्शन गिरसावळे सर यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !