डॉ.मोहन कापगते लिखित " श्री तुकारामदादा गीताचार्य जीवन आणि कार्य " हे पुस्तक गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,०९/११/२५ नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ.मोहन कापगते लिखित श्री तुकारामदादा गीताचार्य जीवन आणि कार्य हे पुस्तक गोंडवाना विद्यापीठात एम.ए.इतिहास या विषयासाठी अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून लावण्यात आले आहे.
सदर पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारकृती संमेलनात महाराष्ट्र राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले होते.लेखकाने सदर पुस्तकात कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य यांच्यावर संशोधन करून त्यांचे कार्य समाजासमोर मांडले आहे.
आधुनिक विदर्भाच्या इतिहासातील अभ्यासक्रमात विदर्भातील सामाजिक चळवळीच्या संदर्भात गुरुदेव सेवा मंडळ व तुकारामदादांचे सामाजिक कार्य महत्त्वपूर्ण आहे.या पुस्तकाच्या अभ्यासक्रमातील समावेशामुळे इतिहासातील मान्यवर मंडळी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून लेखक डाॅ.प्रा.मोहन कापगते यांचे अभिनंदन केले आहे.


