चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील आदिवासी बहुल सुब्बई गावातील,आनंदराव अंगलवार मानद " डॉक्टरेट पदवीने " सन्मानित.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील आदिवासी बहुल सुब्बई गावातील,आनंदराव अंगलवार  मानद " डॉक्टरेट पदवीने " सन्मानित.


एस.के.24 तास


राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील आदिवासी बहुल सुब्बई गावातून प्रतिकूल परिस्थितीत लहानाचे मोठे झालेले,शालेय जीवन ,महाविद्यालयीन जीवनापासून विविध, सामाजिक व शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग घेत राहून एम.ए.इंग्रजी, इतिहास बी.एड.पर्यंत शिक्षण पूर्ण करून सहायक शिक्षक पदावर 25 ते 26 वर्षापासून कार्यरत आहेत.


विदर्भ बेलदार व तत्सम जमाती समाज संघटना, अखिल भारतीय विमुक्त जाती,भटक्या जमाती वेलफेअर संघ, विदर्भ शिक्षक संघ नागपूर, अखिल ओबीसी संघटना, इत्यादी सामाजिक व शैक्षणिक संघटना चे विविध पदावरून सक्रिय राहून सामाजिक शैक्षणिक व आर्थिक, तसेच सांस्कृतिक प्रश्न घेऊन महाराष्ट्र राज्य व भारत सरकार कडे अनेक निवेदन,आंदोलन द्वारा न्यायासाठी लढा देणारे आनंदराव येंकय्याजी अंगलवार यांचे यापूर्वी बेलदार व तत्सम जमाती समाज व भटक्या, ओबीसी समाजाचे प्रश्न बाबत संघर्ष बद्दल विदर्भ बेलदार समाज


लोहार समाज गोल्ला,गोलकर समाज, , चंद्रपूर, नागपूर, पांढरकवडा, बेलदार समाज संघटना वरोरा,चित्रकथी समाज व भटक्या बी समाजसंघटना वाशीम द्वारे कारंजा लाढ, येथे सामाजिक कार्यासाठी समाजभूषण पुरस्कार,कलाजीवन संस्था वरूड द्वारे अमरावती येथे महाराष्ट्र राज्य स्तरीय सामाजभुषण पुरस्कार, सरदार रणजीत सिंह संचदेव फाउंडेशन मुंबई द्वारे शिर्डी येथे सामाजिक प्रतिभा पुरस्कार, कलाजीवन व इलेक्ट्रॉनिक इंजिनियर सर्विसेस संस्था नागपूर द्वारे नागपूर येथे राष्ट्रीय रत्न अवॉर्ड, कलाजीवन तर्फे पुणे येथे भारत गौरव पुरस्कार,भारतीय भटके आदिवासी संस्था औरंगाबाद द्वारे औरंगाबाद येथे राज्यस्तरीय संत नामदेव महाराज समाज भूषण पुरस्कार, प्रगतिशील पत्रकार समाज संघ नागपूर द्वारे मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त 2021मध्ये मूकनायक पुरस्कार, छावा ग्रूप वरोरा तर्फे समाजकार्याबद्दल सन्मान, इत्यादी अनेक संस्था व संघटनांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला. 


श्री.आनंदराव येंकय्याजी अंगलवार यांचे समाज व शिक्षण क्षेत्रातील सक्रिय संघर्ष व सहभाग पाहून यांना विशेष सन्मानाने पाचारण करून नियोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात दिनांक 8/11/202 5 रोजी दुपारी 3ः00 दशमेश प्लाझा द काॅस्ल ऑफ आर्ट फरीदाबाद/ दिल्ली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमातमॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड व आर्ट युनिव्हर्सिटी फरीदाबाद द्वारे पुरस्कार प्रसंगी मानद डॉक्टरेट/आचार्य पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीच्या पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मा डॉ ,श्री.सी.पी.यादव,अध्यक्ष मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड व संस्थापक मॅजिक आणि युनिव्हर्सिटी फरीदाबाद


 प्रमुख पाहुणे डॉ.श्री.राजेंद्र सैनी सी,पी,आर, मास्टर्स ट्रेर्नर आॅफ अमेरीकन रेड क्रॉस सोसायटी दिल्ली.व इतर गन मान्य प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत संपन झालेल्या कार्यक्रमात डॉक्टररेट उपादी प्रदान करण्यात आले आहे.   


या सोहळ्यात भारतातील विवविध राज्यांतील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीनाही मानद डॉक्टरेट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले . या प्रसंगी आमचे प्रतिनिधीशी बोलताना डॉ. आनंदराव अंगलवार (H.C ) यांना अतिशय आनंद झाला व याचे श्रेय ज्यांचे सहकार्याने समाजात सक्रिय राहण्यास ऊर्जा मिळते.


 ते आधार म्हणजे त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य,समाजसंघटणेतील सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक व संघटक, शाळेतील सर्व सहकारी मित्र यांना जाते, पुढे समाज व शिक्षण क्षेत्रात निरंतर कार्य करत राहण्यास ऊर्जा प्राप्त झाले असे भावना व्यक्त केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !