पोलीस पथकाने पोस्टे धानोरा व मुरुमगाव येथे दाखल एकूण 04 गुन्हे आणले उघडकीस. 📍चारचाकी,दूचाकी वाहन व मोबाईल टॉवरच्या बॅट­यांसह एकूण 27 लाख 71 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.

 


पोलीस पथकाने पोस्टे धानोरा व मुरुमगाव येथे दाखल एकूण 04 गुन्हे आणले उघडकीस.


📍चारचाकी,दूचाकी वाहन व मोबाईल टॉवरच्या बॅट­यांसह एकूण 27 लाख 71 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.


एस.के.24 तास


  मुरूमगाव / धानोरा :  (दि,12/12/2025) गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणाखाली जिल्ह्रातील दुर्गम अतिदुर्गम भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही काळापासून मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री.नीलोत्पल यांनी पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील अधिका­यांना सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. 


त्यावरुन कौशल्यपूर्ण तपास करुन गडचिरोली पोलीसांनी विविध ठिकाणावरुन मोबाईल टॉवर बॅट­या चोरी करणा­या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे. 

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्रातील संवेदनशिल भागातील रामपूर, तुमडीकसा, कनगडी, कुटभट्टी व तोयागोंदी गावातील वाढत्या मोबाईल टॉवर बॅट­या चोरीच्या घटना लक्षात घेता, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.विश्वंबर कराळे व पोउपनि. सचिन ठेंग यांच्या पोलीस पथकाने तपास दरम्यान बालोद (छ.ग) मार्गावरील विविध सिसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता एका संशयीत पिकअप वाहनाच्या क्रमांकावरुन वाहन मालकाचे नाव व मोबाईल क्रमांक मिळाल्याने सदर वाहन मालकावर पाळत ठेवली. 


यानंतर दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सदर वाहन मालक येरकड हद्दीत संशयीतरित्या फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर सहा. पोलीस अधीक्षक धानोरा श्री.अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा,सावरगाव, येरकड व मुरुमगाव अशा चार ठिकाणी रात्रकालीन सापळा करुन संशयित वाहन मालकावर पाळत ठेवली असता,येरकड हद्दीतील मोवाड येथुन 04 आंतरराज्यीय आरोपी नामे 1) साबीर रमजान मलिक, वय 39 वर्षे, रा.मोहल्ला कल्याणसिंग मवाना (उ.प्र.), 2) अशोक हरीसींग मोर्या, वय 49 वर्षे, रा. न्यु सरेंद्रनगर थट्टीपूर, ग्वालीयर (म.प्र.), 3) जितेंद्र कुमार लक्समीचंद राठोड, वय 26 वर्षे, रा. नेताजी नगर, जाजगीर ता. जि. जाजगरी (छ.ग.) व 4) नामदेव रामा कांबळे, वय 43 वर्षे, रा. नेताजी नगर, एम.पी. नगर, भोपाल (म.प्र.) यांना ताब्यात घेण्यात आले. 


यासोबतच त्यांच्याकडून 01 पिकअप चारचाकी वाहन अंदाजे किंमत 5,00,000/- रुपये, 01 दूचाकी वाहन अंदाजे किंमत 50,000/- रुपये, 08 नग बीएसएनएल मोबाईल टॉवरच्या बॅट­या अंदाजे किंमत 8,00,000/- रुपये, 4 मोबाईल फोन अंदाजे किंमत 20,000/- रुपये, कटर व इतर साहित्य अंदाजे किंमत 1000/- रुपये जप्त करण्यात आले. सदर आरोपींना विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता,आरोपींनी पोमकें सावरगाव हद्दीतील 02 टॉवरच्या 16 बॅट­या, पोस्टे मुरुमगाव हद्दीतील 02 टॉवरच्या 16 बॅट­या अशा एकूण 32 बॅट­या चोरी केल्याचे कबूल केले.


सदर बॅट­या दिल्ली येथे विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर 32 बॅट­यांचा पोलीस पथकाने दिल्ली येथे शोध घेतला असता, दिल्ली येऊन लीनेज कंपनीच्या एकूण 13 बॅट­या अंदाजे किंमत 14,00,000/- रुपये हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले. सदर आरोपींकडून एकूण 13,71,000/- रुपये किंमतीचा व दिल्ली येथुन 14,00,000/- रुपये किंमतीचा असा एकूण 27,71,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपींना मा. न्यालयालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीतांना 05 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.


आरोपीतांकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासादरम्यान, पोस्टे मुरुमगाव येथील 03 गुन्हे व पोस्टे धानोरा येथील 01 गुन्हा असे एकूण मोबाईल टॉवर बॅट­या चोरीचे 04 गुन्हे तपासादरम्यान उघडकीस आले आहेत. सदर आरोपी सध्या पोस्टे मुरुमगाव येथील गुन्ह्रात अटकेत असून सर्व गुन्ह्रांचा तपास गडचिरोली पोलीसांकडून केला जात आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी.सहाय्यक पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोमकें सावरगावचे पोउपनि.विश्वंबर कराळे, पोस्टे मुरुमगावचे पोउपनि.सचिन ठेंग,पोमकें येरकडचे पोउपनि.गोरखनाथ सुरासे व पोमकें सावरगाव, येरकड व पोस्टे मुरुमगाव येथील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !