राजुरा - गडचांदूर मार्गावर बसचा अपघात ; 6 प्रवासी किरकोळ तर 1 गंभीर जखमी.
एस.के.24 तास
राजुरा : राजुरा येथून गडचांदूर कडे जाणारी एसटी बस (क्रमांक MH 34 Y 5321) चे चालकाचा वाहणावरून नियंत्रण सुटलेल्याने आज राजुरा - गडचांदूर मार्गावरील नाइकनगर जवळ रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त बस ही राजुरा आगाराची असून बसचे चालक उमेश कुक्षिकांत असल्याची माहिती आहे. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाली नसली तरी प्राथमिक तपासात सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या अपघातात जखमी झालेल्यांची नावे
प्रिया पोपटे वय,32 वर्ष वाहक,किष्या इटकेलवार वय,17 वर्ष,मंजुषा डोहे वय,41 वर्ष,शुभांगी मोहूर्ले वय,29वर्ष,माला राठोड वय,58 वर्ष,नारायण कनाके,सुंदराबाई इटकेवार अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
वाहक प्रिया पोपटे गंभीर जखमी असल्याने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेची नोंद घेण्यात येत असून पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

