कवी : - श्रीदेवी संतोष मेश्राम यांच्या लेखणीतून...
!! नववर्ष !!
एस.के.24 तास
वर्ष नवा आला वर्ष नवा आला
साऱ्यांच्या मनाला हर्ष नवा झाला
वर्ष नवा आला वर्ष नवा आला...
कालची सरली ती जुनी रात
आजची उजळली नवीच पहाट
उमलत्या फुलांनाही गंध नवा आला
वर्ष नवा आला वर्ष नवा आला...
रुपेरी किरणे आली सोनपावलांनी,
पक्षी सुस्वरे गाती गोड नवी गाणी
नव्या दिवसाचा हा दर्श नवा झाला
वर्ष नवा आला वर्ष नवा आला...
प्रभात काळी सडे शिंपिले
रांगोळ्यांनी आंगण सजले
वसुंधरेला ही आज नवा साज झाला
वर्ष नवा आला वर्ष नवा आला...
नवनवीन भासे असूनी ते,जुणेच सर्वकाही
नववर्षाची ही अशी नवलाई,
जुन्याच भावनांना त्या स्पर्श नवा झाला...
वर्ष नवा आला वर्ष नवा आला
नव वर्षात नवी कास धरू
सहल - सम्मेलन अन् पर्यटन ही करु
करूया कि गोड - धोड रात्री जेवणाला
वर्ष नवा आला वर्ष नवा आला...
जुने राग द्वेष मत्सर ते सोडूनी द्याना
नवणावीन्याचा स्वीकार करा ना
सांगणे असे हे या नव्या पिढीला
वर्ष नवा आला वर्ष नवा आला...
एक दुसऱ्याला शुभेछा ही देऊ
एकात्मतेने सारे भारतीय राहू
जे की अभिप्रेत या भारत मातेला
वर्ष नवा आला वर्ष नवा आला...
कवी : - सौ.श्रीदेवी संतोष मेश्राम चंद्रपूर मो.7588510950

