रोशनकुमार पिलेवान यांचे आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून काव्य वाचन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - १५/१२/२५ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगांव (भोसले )येथिल कवी रोशनकुमार शामजी पिलेवान यांचे आकाशवाणी चंद्रपूर केंद्रा वरून कामगार विश्व या कार्यक्रमात काव्य वाचन प्रसारित करण्यात येणार आहे.रोशनकुमार पिलेवान हे पदवीधर शिक्षक असून त्यांचे " ठिगळ " कविता संग्रह आणि "डबल गेम" हा कथा संग्रह प्रकाशित आहेत.त्यांनी झाडीपट्टी रंगभूमी साठी नाट्य लेखन सुध्दा केलेले आहे.
या पूर्वी सुध्दा रोशनकुमार यांचे काव्य वाचन, कथा वाचन तथा मुलाखत आदी कार्यक्रम प्रसारित करण्यात आलेले आहेत. यासाठी त्यांचे साहित्य,नाट्य आणि शिक्षण विभागातून अभिनंदन करण्यात आले आहे.

