वाघाची दहशत संपता संपेना... 2 दिवसात 1 महिला तर दुसऱ्या दिवशी मुल तालुक्यात गुराखी वाघाच्या हल्यात ठार.

वाघाची दहशत संपता संपेना...

2 दिवसात 1 महिला तर दुसऱ्या दिवशी मुल तालुक्यात गुराखी वाघाच्या हल्यात ठार.


एस.के.24 तास


मुल : मुल तालुक्यातील बेलगाटा येथील रहिवासी असलेला पीतांबर हा नेहमी प्रमाणे शनिवारी गावातील गुरे चराईसाठी जंगलाच्या दिशेने गेलेेला होता.संरक्षित वन क्षेत्रात कम्पार्टमेंट नंबर 1765 मध्ये गुरे चरत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पीतांबर वर हल्ला करून त्यास जागीच ठार केले.जंगलात फरफटत नेल्याने त्याचा मृतदेह इतरांच्या निदर्शनास आला नाही.


सांयकाळी गावात गुरे परत आली.पीतांबर न दिसल्याने कुटुंबीयाना शंका आली.याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली.रविवारी सकाळी वनविभागाच्या चमूंनी शोधाशोध घेतली असता जंगला लगतच्या शेतात पीतांबर चा मृतदेह आढळून आला.सावली वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.


पुढील तपास सावली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस.ए.नागोसे, एस.जे.आदे,बोरकर हे करीत आहेत. 


बेलगाटा मुल तालुक्यातील महसूली गाव असून वनक्षेत्र सावली विभागातंर्गत येते.वाघाच्या वाढत्या हल्ल्यांनी मुल तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !