युवराज भांडेकर सरपंच यांनी घडवून आणला मोकळा श्वास चा आनंद.
एस.के.24 तास
गडचिरोली : येवली ग्रामपंचायत चे सरपंच युवराज भांडेकर यांनी स्व खर्चातून होतकरू व गावास दिशा देणाऱ्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील चनाखा येथिल एक मोकळा श्वास येथे सैर घडवून आणली.आदर्श गाव संकल्पनेचे मार्गदर्शक डॉ.गुरुदास सेमस्कर व ग्रा.पं.सदस्य चोखाजी बांबोळे यांच्या नेतृत्वाखाली प्रितम गेडाम उपसरपंच
सौ किरण चचाणे ग्रा पं सदश्य,कविता गेडाम,विद्या भांडेकर,शिल्पा शिडाम, कार्यकर्ते कर्मचारी आशिष कंठीवार, विजय कुनघाडकर, प्रकाश भांडेकर, हर्षाताई मेश्राम, सौ कंठीवार ताई यांनी एक मोकळा श्वास या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि कृषी व ग्रामीण पर्यटनाची मजा चाखली.
यात ग्रामीण संस्कृती, पारंपारिकता, हुरडा पार्टी, बैलबंडी व घोडा स्वारी,जादूचे प्रयोग,रस्सीखेच, झुले,ट्राकीग, संगिताच्या तालावर कारंजे व आंघोळ,पोहणे, ग्रामीण अस्सल मराठमोळ्या जेवणाची अंगत पंगत मेजवानी अशाप्रकारे सकाळ पासून दिवसभरात विविध उपक्रमाचा समावेश होता.


