1 लाखाचं कर्ज 74 लाखांवर, सावकाराकडून भरमसाठ व्याज वसुली; पैशांसाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली. 📍सावकारपुढे पोलीस हतबल तक्रार देऊनही कारवाई नाही ; मंत्रालयात पुढे संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करू,असा इशारा शेतकरी रोशन कुडे यांनी दिला आहे.

1 लाखाचं कर्ज 74 लाखांवर, सावकाराकडून भरमसाठ व्याज वसुली; पैशांसाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली. 


📍सावकारपुढे पोलीस हतबल तक्रार देऊनही कारवाई नाही ; मंत्रालयात पुढे संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करू,असा इशारा शेतकरी रोशन कुडे यांनी दिला आहे.


एस.के.24 तास


नागभीडचंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे.कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली.या क्रूर प्रकाराने महाराष्ट्र हादरला आहे.जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथुर गावात हा प्रकार घडला.बळीराजाच्या वेदना पाहून दगडालाही पाझर फुटेल.सरकार,प्रशासनाला बळीराजाचं आभाळाएवढं दुःख कधी दिसलंच नाही.

या कर्जबाजारी शेतकऱ्याची वेदना आभाळाला भिडणारी आहे. सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादायी प्रसंग ओढवला आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे रोशन सदाशिव कुडे. ते चंद्रपूर जिल्हातील मिंथुर गावातील रहिवाशी आहेत. निसर्गाला जिंकणारा बळीराजा सावकारीला हरला आहे.

रोशन कुडे यांच्याकडे 4 एकर शेती आहे.या शेतीवरच त्यांचा कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालतो.निसर्गाचा लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही.त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं. दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी गाई खरेदी केल्या. यासाठी त्यांनी दोन सावकाराकडून 50 - 50 हजार रुपये घेतले.येथेही त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्या.त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला.

सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली. ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकलं. मात्र कर्ज काही संपेना. एक लाखाचे कर्ज 74 लाखावर गेलं.सावकाराकडून भरमसाठ व्याजासह वसुली केली जात आहे. एका लाखावर दिवसाला 10 हजार प्रमाणे व्याज घेतलं जात असल्याने शेतकऱ्याने 1 लाख घेतलेलं कर्ज तब्बल 74 लाखांवर गेला.

शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला.एका एजंटने रोशन कुडे यांना कोलकत्ता येथे नेलं.कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली.ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.

अन्याय झाला की सामान्य माणूस पोलीस स्टेशन गाठतो.येथे न्याय मिळेल ही अपेक्षा असते.कुडे यांच्याबाबत तसं घडलं नाही.कुडे यांनी सांगितले,पोलीस अधिक्षकांकडे मी तक्रार दिली.त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं, तर कुडे यांच्यावर दुदैवी प्रसंग ओढवला नसता.

1 लाख कर्ज घेतलं होतं. त्याचे 74 लाख झाले. शेतकऱ्याचं अजूनही कर्ज पूर्णपणे फिटलेलं नाही. पैशासाठी तगादा सुरूच आहे.कर्जासाठी किडनी गेली.आता हाती काहीच उरलं नाही.आता मंत्रालयात पुढे संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करू,असं शेतकरी कुडे यांनी म्हटलं आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !