दोन वृक्षांच्या तोडीसाठी अधिवेशन गाजले ; तर तब्बल ९ सागवान वृक्षतोडीची कारवाई थंडबस्त्यात गडचिरोली - वडसा वनविभागातील प्रकरण.

दोन वृक्षांच्या तोडीसाठी अधिवेशन गाजले ; तर तब्बल ९ सागवान वृक्षतोडीची कारवाई थंडबस्त्यात गडचिरोली - वडसा वनविभागातील प्रकरण.


एस.के.24 तास


गडचिरोली :- नुकतेच राज्याच्या उपराजधानीत ८ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाचे रविवार १४ डिसेंबर रोजी सूप वाजले. अधिवेशनात सर्वात जास्त फोकस पडला तो महसूल विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांचे निलंबन.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल १४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्याने सर्वांचे धाबे दणाणले.


अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा शहरातील हनुमान मंदिर परिसरात पोळ्याच्या दिवशी नगर परिषद प्रवेशद्वारा समोरील चिचवा व जांभूळ प्रजातीच्या दोन झाडांची विनापरवानगीने कत्तल करण्यात आल्याने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून वृक्षतोडीचे प्रकरण सभागृहात मांडले. प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. केवळ दोन वृक्षांची तोड झाल्याने अधिवेशन गाजले. 


गडचिरोली वनवृत्ताच्या वडसा वन विभागा अंतर्गत येणाऱ्या पुराडा वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील रामगड उपक्षेत्रातील रामगड नियतक्षेत्र कक्ष क्रमांक-२४१ मध्ये मुख्य मार्गालगत अज्ञात इसमांनी तब्बल ९ सागवान वृक्षांची अवैधरीत्या वृक्षतोड केल्याने याबाबत पुराव्यानिशी तक्रार करूनही गेल्या दीड महिन्यांपासून अजूनपावेतो कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याने " आम्ही करू ती पूर्व दिशा " असे तर केले जात नाही ना..!  


विशेष म्हणजे, सागवान तस्करांनी अवैधरीत्या वृक्षतोड करून पळवाटेसाठी मुख्य मार्गालगत मुरूम टाकून रस्ता केला. त्यातच, वृक्ष तोडीसाठी मशिनचा वापर करण्यात आला. याबाबत उपवनसंरक्षक वडसा तसेच गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक यांना अवैध सागवान वृक्ष तोडीबाबत कारवाई करण्यास पत्रव्यवहार करून वेळोवेळी कळविण्यात आले आहे.  


गेल्या दीड महिन्यांपासून अजूनपावेतो कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.पुराडा वनपरिक्षेत्रात झालेल्या अवैध सागवान वृक्षतोडीबाबत अधिकाऱ्यांना गांभीर्य नसून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार दिसून येत आहे. सागवान सारखे मौल्यवान वृक्ष मशीनच्या साहाय्याने वन क्षेत्रातून अवैधरीत्या तोडण्यात आले असतांनाही कारवाई करण्यास चालढकल करण्यात येत असल्याने याचे नवल वाटत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !