ब्रम्हपुरी पोलीसांनी मोटारपंप चोरी करणाऱ्या ला ठोकल्या बेड्या.

ब्रम्हपुरी पोलीसांनी मोटारपंप चोरी करणाऱ्या ला ठोकल्या बेड्या. 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक. 


ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी पोलीस ठाणे येथे दि. ०२.०२.२०२६ रोजी फिर्यादी नामे सोमेश्वर श्रीराम दवे रा. सोनेगाव ता. ब्रम्हपुरी यांनी पोस्टेला येथून तक्रार दिली की, शेतात पाणी करण्यासाठी नदीमध्ये लावलेले मोटार पंप कोणीतरी अज्ञात इसमाने नट बोल्ड काढून चोरून नेल्याची तक्रार दिल्याने पोस्टे अप क्रमांक ११६/२०२६ कलम ३०३ (२) भा.त्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


सदर गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी व मोटारपंप शोध कामी सपोनी खडसे सा व सोबत डी.बी. स्टॉप पोस्टे परीसरात शोध घेत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, मीजा सोनेगाव शेतशिवारात दोन ईसम मोटारपंप मधील तांबा काढूण व मोटारपंप शेतात लपवून ठेवल्याची खात्रिशीर खबर मिळाल्याने नमुद आरोपी क्रमांक ०१. अनिल रामाजी मंद ०२. राजू साहदेव चावने दोन्ही रा. सोनेगाव यांना ताब्यात घेवून विश्वासात घेवुन विचारपुस केली.


 सोनेगाव येथील नदीघाटवरील ३ एच.पी. ची मोटार पंप चोरुन नेल्याचे सांगीतले वरुन त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी मौजा सोनेगाव येथील नदीघाटावरील ईतर दोन मोटार पंप तसेच बेटाळा येथील नदीनाल्यामधील एक मोटार पंप चोरी केल्याचे सांगीतल्याने सदर आरोपीकडून एकून ०४ मोटारपंप हस्तगत करण्यात आले आहे.


सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा.मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.ईश्वर कातकडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी श्री.दारासिंग राजपूत सा, पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बानबले मा. यांचे मार्गर्शनाखाली ब्रम्हपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथक चे सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोज खडसे सा. यांचे नेतृत्यामध्ये पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार वशिष्ट रंगारी, प्रविन भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान व स्वप्नील पळसपगार यांनी केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !