विदर्भ पोदार लर्न स्कूल,गडचिरोली येथे दि.२० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी " विदर्भ फूड फिएस्टा २०२५" चे भव्य आयोजन.
एस.के.24 तास
गडचिरोली : विदर्भ पोदार लर्न स्कूल, गडचिरोली (सीबीएसई) यांच्या वतीने विदर्भातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी " विदर्भ फूड फिएस्टा २०२५ " या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम शनिवार, दि.२० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० ते ९.०० या वेळेत विदर्भ पोदार लर्न स्कूलच्या शालेय मैदानात, गडचिरोली येथे होणार आहे.
या फूड फिएस्टामध्ये शाळेतील मुले आणि त्यांच्या पालकांनी प्रेमाने तयार केलेल्या घरगुती व पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची अनोखी संधी उपस्थितांना मिळणार आहे.उत्सवी वातावरणात, चवदार पदार्थांसह कुटुंबीयांसोबत आनंद साजरा करता येणार आहे.हा कार्यक्रम सर्व माता-पिता, विद्यार्थी, नागरिक व कुटुंबीयांसाठी खुला असून, खाद्यसंस्कृती, एकत्रित सहभाग आणि आनंद यांचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे.
विदर्भ पोदार लर्न स्कूल प्रशासनातर्फे सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून, मुले आणि त्यांच्या पालकांनी बनविलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

