राकेश पिलेवान यांची राज्यस्तरीय तबला वादन स्पर्धेसाठी निवड.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्यतर्फे सन 2025 - 26 सत्रात विभाग स्तरीय संगीत वाद्यवादन स्पर्धा डायट चंद्रपूर येथे पार पडल्या.त्यात राकेश पिलेवान यांची संगीत वाद्यवादन स्पर्धेसाठी राज्यस्तराकरीता निवड झाली आहे.राकेश पिलेवान हे बेलगांव जाणी प.स.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत आहेत.
ते संगीत विशारद असून भजन,कीर्तन,नाटक आदी कार्यक्रमांना संगीत साथ करतात आहेत.त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी,ग.शि.अ.तथा शिक्षकांनी अभिनंदन केले. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

