दूसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल पुणे २०२६ अध्यक्षस्थानी सौ.लता शिशुपाल शेंद्रे यांची निवड.
एस.के.24 तास
गडचिरोली : २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२५ असा चार दिवसीय आंतरराष्ट्रीय फेस्टीवल चे आयोजन एस.एम.जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन,पुणे या सभागृहात करण्यांत आयोजन केलेले आहे.या अभियानाचे आयोजन कवि,लेखक,गितकार, संगितकार,गायक प्राथमिक शिक्षक फुले प्रेमी संविधान दूत श्री.विजय वडेवेराव यांनी केलेले आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा प्रचार प्रसार व्हावा,देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा भिडेवाड्याचा इतिहास जतन व्हावा म्हणून चार दिवस शेकडो कविंच्या च्या ताफ्यासह आयोजित होणार आहे.तसेच महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जिवनावर आधारित शालेय विध्यार्थांना या आंतरराष्ट्रीय विचार मंचावर एकपात्री नाट्य प्रयोग,पोवाडा, नृत्य तसेच महिला सक्षमीकरणासाठी लाठी - काठी,दांडपट्टा यांचे प्रात्याक्षीक असे विविध उपक्रम होणार आहेत.
महात्मा ज्योतीबा फुले,सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण समता,स्त्री - पुरुष समानता, न्यास व संविधानाच्या विचारधारेवर न्याय व समता, बंधुभाव,संविधानाचे आधारे कविता सादरीकरणासाठी दुस-यांदा संधी मिळाली आहे.या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय फेस्टीवल चे कवि संमेलनाचे अध्यक्षपदी सौ.लता शिशुपाल शेंद्रे यांची निवड झालेली आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे उत्तंग कार्याचा प्रचार व प्रसार व भारतीय संविधान विषयी काव्य जागरण व जनजागृती करण्यांचे उदात्त हेतुने आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल,पुणे येथे कार्य होत असतात तसे या फेस्टीवलचे आयोजक संविधान दुत मा.श्री.विजय वडवेराव सर यांच्या कडुन निवडपत्र देण्यांत आले आहे.यासाठी त्यांचे साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडुन अभिनंदन केले जात आहे.

