गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी महिला शेतकऱ्यांचे आमरण उपोषण ; तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांची काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांसह उपोषणाला भेट.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - १६/१२/२५ गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना मिळावे यासाठी कार्यकारी अभियंता गोसेखुर्द उजवा कालवा विभाग कार्यालय सायगाटा या कार्यालयासमोर महिला शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
सदर आमरण उपोषणाला ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके,माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डी.के.मेश्राम, कृउबा संचालक ज्ञानेश्वर झरकर यांनी भेट दिली.
यावेळी ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके व उपस्थित मान्यवरांनी उपोषणकर्त्यांसोबत संवाद साधत आपला देखील सदर उपोषणाला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.उन्हाळी शेत हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळावे यासाठी आपण देखील यापूर्वी गोसेखुर्दचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होते असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.


