शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे - राष्ट्रीय किसान मोर्चाचे निवेदन.
एस.के.24 तास
गडचिरोली : सोयाबिन,कापूस,धान यासह सर्व शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने नरेंद्र राखडे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.निवेदनातील मागण्या आहेत की, शेतमालाची शासनाने ठरविलेल्या किमान आधारभुत किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी करू नये.खाजगी व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी करण्यास बंदी आणावी.
स्वामिनाथन आयोगानुसार शेतमाल खरेदी करावे . शेतकऱ्यांना ऑनलाईन करण्याचा खर्च व दिवसभर लाईनमध्ये उभे राहण्याचा त्रास देऊन नये.दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी त्यांना कर्जमाफी मिळावीशासकिय नियमानुसार आधारभुत खरेदी केंद्र सुरु करावे शासकिय खरेदी केंद्र नेहमी सुरु ठेवावे.
हे आंदोलन बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर व आरपिआय चे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.निवेदन देते वेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे संयोजक प्रमोद राऊत,जिल्हाध्यक्ष जयंत गेडाम उपस्थित होते .
यावेळी लवकुश भैसारे , दामोधर शेंडे , हेमंत बारसागडे , मदन उराडे , मारोती भैसारे धर्मेंद्र उराडे , रोशन उके , निशा बोदेले , सुरेखा ठाकूर , प्रेमलता कान्हेकर, माया मेश्राम ' मंगला बावनवाडे , अमिता भैसारे , पितांबर खेवले , भगवान सहारे , दयाराम गावतुरे , जिवन मेश्राम लोकेश पिपरे , सुनिल मोहुर्ले , रत्नाकर राऊत , डोमाजी गेडाम , श्रीरंग उंदिरवाडे नाजुक भैसारे चरण बारसागडे आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .


