ब्रम्हपुरी नगरपरिषद काँग्रेसची एक हाती सत्ता.२३ पैकी २१ जागा जिंकून नगरपरिषदवर कॉग्रेस चा झेंडा
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : अचूक नेमबाजी ,अभेद्य मारा, काँग्रेस कार्यकर्त्यांना, उमेदवारांना व मतदारांना मतदान करण्यासाठी योग्य प्रशिक्षण , डावपेच देऊन ब्रह्मपुरी नगर परिषदेचे सिंहासन काबीज करण्यासाठी निवडणुकीचे शस्त्र हाती धरून निघालेले ब्रह्मपुरी विधानसभे चे आमदार सेनापती विजयभाऊ वडेट्टीवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या ब्रह्मपुरी नगरपरिषदेमध्ये ब्रह्मपुरी च्या प्रत्येक वार्डात योग्य उमेदवारांची काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने निवड करून उमेदवार दिले.
मतदारांनी उमेदवारांना पसंती दर्शवून त्यांना निवडून दिले आणि त्यामुळेच ब्रह्मपुरीच्या नगरपरिषदेच्या सिंहासनावर योगेश भाऊ मिसार यांच्या रूपाने नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले आणि ब्रह्मपुरीचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी वाशीयांच्या मनात आपल्या विकासाचा ठसा उमटविला आणि २३ पैकी २१ नगरसेवक जिंकून एक हाती सत्ता स्थापन केली.
आज ब्रह्मपुरीत रंग खेळतो भाऊ विजू...
सहकाऱ्यांच्या सोबतीत नाचतो भिजू भिजू ...
असे चित्र विजययोत्सव साजरा करतांना आमदार साहेबांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
आज घोषित झालेल्या निवडणूक निकालात काँग्रेस पक्षाचे योगेश मिसार यांनी आपले निकटम प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे सुयोग बाळबुद्धे यांचा ९५७३ मतांनी पराभव करून ब्रह्मपुरी चे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले.
सुयोग बाळबुद्धे यांना ५८३५ तर योगेश मिसार यांना १५४०८ मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे निहाल ढोरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना ८३२ मते, शिवसेना उबाठाचे मिलिंद भन्नारे यांना ७३० मते मिळाली.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला ०१ तर राष्ट्रवादी पार्टीला ०१ जागा जिंकून समाधान मानावे लागले.
प्रभाग निहाय विजय उमेदवार व त्यांना मिळालेली मते.
प्रभाग ०१ -
अ) काजल तलमले - १०९२ काँग्रेस.
ब) चंद्रकांत बावनकुळे-९५३
काँग्रेस
प्रभाग - ०२
अ) बबीता आमले - १४८९
काँग्रेस.
ब) प्रकाश खोब्रागडे- ९३०
काँग्रेस
प्रभाग -०३
अ) मनोज कावळे -११०२
ब) रेणू ठेंगरे -१२६१
प्रभाग -०४
अ) अनुकूल शेंडे - ६७५
ब)जयश्री कुथे - ६४७
प्रभाग - ५
अ)सतीश हुमणे - ९५३
ब) रंजना पिसे - ११०४
प्रभाग - ६
अ) हेमलता सिंहगडे - ९७१
ब) जगदीश(मोंटू पिलारे- १३९९
प्रभाग -७
अ) गीता मेश्राम - ९५८
ब) सचिन राऊत - ८६४
प्रभाग - ८
अ) पुष्प लता पोपटे- १०१०
ब ) नितीन उराडे - १२०१
प्रभाग - ९
अ) मनोज भुपाल बीजेपी- ८३५
ब) सपना बल्लारपुरे - ९०० काँग्रेस
प्रभाग - १०
अ ) राकेश पडोळे- ९९२
ब ) ज्योती राऊत - ८०२
प्रभाग -११
अ ) माधुरी उपासे - २०५५
ब )रंजना बुराडे - १९८८
अ )अविनाश राऊत - १२६२
राष्ट्रवादी .
अंतर्गत कलहामुळे नगरपरिषद निवडणुकीत बीजेपी चे माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेली ही निवडणूक पक्षाला मारक ठरली असे जनसामान्यात बोलल्या जात आहे.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सिंदेवाही, सावली, ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्रातील गावांचा आणि ब्रह्मपुरी चा करीत असलेल्या विकासाचा कायापालट हे मतदारांनी आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी नजरेसमोर ठेवून विजुभाऊ च्या तत्त्वनिष्ठ विकासाच्या दूरदृष्टीकोणावर आणि विकास कामावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाला प्रतिस्पर्धी पक्ष बीजेपीचा पराभव करण्याची परत एकदा संधी मिळाली.
या एकतर्फी विजयामुळे ब्रह्मपुरीचे आमदार विजय भाऊ वडेट्टीवार त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे काँग्रेस कार्यकर्ते आणि मतदार बंधू यांचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश भाऊ बालाजी मिसार, नगरसेवक यांनी त्यांचे आभार मानले आहे.

