डोंगरगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्य सामान्य ज्ञान व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन.
एस.के.24 तास
मुल : मुल तालुक्यातील डोंगरगांव येथे सत्यशोधक सार्वजनिक वाचनालय, डोंगरगांव तथा क्रांतिसुर्य युवा सांस्कृतिक मंच, डोंगरगांव यांच्या सौजन्याने ३ जानेवारी "क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले", ९ जानेवारी "फातिमा शेख" आणि १२ जानेवारी "राष्ट्रमाता जिजाऊ" यांच्या जयंती सप्ताहाच्या निमित्याने "भव्य सामान्य ज्ञान व वक्तृत्व स्पर्धा" याचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ज्ञान हे त्यांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर वर्गाबाहेरील जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करते . सामान्य ज्ञान म्हणजे केवळ तथ्ये आणि आकडे सांगणे नाही. ते मानसिक क्षमता विकसित करण्यास, सामाजिक आणि भावनिक कौशल्ये सुधारण्यास, तर्क आणि विचार कौशल्ये सुधारण्यास आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करते. तसेच आपले वक्तृत्व हे केवळ बुद्धिमत्ता किंवा ज्ञानाबद्दल नाही; ते व्यावहारिक शहाणपण आणि समजुतीबद्दल आहे जे आपले निर्णय आणि इतरांशी संवाद साधण्याचे मार्गदर्शन करते. याच उद्दिष्टाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
!! भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा !!
गट - अ ( खुला वर्ग ) प्रवेश फी ५०₹ ::-
प्रथम पुरस्कार :- ३००१₹ रोख, द्वितीय पुरस्कार : - २००१₹ रोख, तृतीय पुरस्कार: - १००१₹ रोख परीक्षा :- दि.२५ डिसेंबर २०२५ ( गुरुवार ) दु.१ ते २.३० पर्यंत.
स्थळ :- महात्मा गांधी महाविद्यालय, राजोली.
-----------------------------------------------
गट - ब ( ९ वी ते १२ वी ) प्रवेश फी ३०₹ ::-
प्रथम पुरस्कार :- २००१₹ रोख, द्वितीय पुरस्कार : - १५०१₹ रोख, तृतीय पुरस्कार: - १००१₹ रोख
परीक्षा :- दि.२५ डिसेंबर २०२५ ( गुरुवार ) स. ११ ते १२ पर्यंत.
स्थळ :- अब्दुल शफी विद्यालय, राजोली.
-----------------------------------------------
गट - क ( ५ वी ते ८ वी ) प्रवेश फी २०₹ ::-
प्रथम पुरस्कार :- १००१₹ रोख, द्वितीय पुरस्कार : - ७०१₹ रोख, तृतीय पुरस्कार: - ५०१₹ रोख
परीक्षा :- दि. २ जानेवारी २०२६ ( शुक्रवार ) दु.१ ते २.३० पर्यंत.
स्थळ :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगांव.
!! वक्तृत्व स्पर्धा ( ४ थी ते ७ वी) !!
प्रथम पुरस्कार :- ५०१₹ रोख, द्वितीय पुरस्कार : - ४०१₹ रोख, तृतीय पुरस्कार: - ३०१₹ रोख
परीक्षा :- दि. २ जानेवारी २०२६ ( शुक्रवार ) दु.३ ते ५ पर्यंत.
स्थळ :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगांव.
-----------------------------------------------
( टिप- स्पर्धकांना आकर्षक भेट वस्तू दिल्या जातील.)
बक्षीस वितरण समारंभ :- ४ जानेवारी २०२६ (रविवार) क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती सोहळा कार्यक्रम स्थळी.
तरी वरील "सामान्य ज्ञान व वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या अंगी गुणांना प्रोत्साहन द्यावा, असे आव्हाहन आयोजकांनी केला आहे.
अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क करा.- सुधीर शेंडे ९६७३४५५०७४


