अहेरी येथील प्राणहिता पोलिस कॅम्पमधील सी 60 चे जवान सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास पोरतेट पोलिस शौर्य पदकांने सन्मानित.

अहेरी येथील प्राणहिता पोलिस कॅम्पमधील सी 60 चे जवान सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास पोरतेट पोलिस शौर्य पदकांने सन्मानित.


एस.के.24 तास


अहेरी : येथील प्राणहिता पोलिस कॅम्पमधील सी 60 चे जवान सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास मारोती पोरतेट यांनी माओवादी विरोधी विशेष अभियानात अनेकदा केलेल्या सौयपुर्ण कार्याची दखल घेत केंद सरकारने त्यांची शौर्य पदकांसाठी निवड केली आहे.


22 एप्रिल 2018 रोजी राबविण्यात आलेल्या माओवादी विरोधी विशेष अभियानात कमलापूर-बोरिया जंगलात दब्बा धरून बसलेल्या माओवाद्यासोबत उडालेल्या चकमकीत विलास पोरतेट यांनी मोठ्या धैर्य व संयमणे प्रतिकार करत जखमी पोलिस जवान व स्वतःचे संरक्षण करत माओवाद्यांच्या प्रखर गोळीबाराला चोख प्रतिउत्तर देत शौर्यपूर्व कामगिरी केली. 


यावेळी 40 माओवाद्यांना कंटस्नान घालण्यात गडचिरोली पोलिस दलास यश प्राप्त झाले. त्यांच्या या कार्याची दखल गृहमंत्रालयाने घेत त्यांची पोलिस शौर्य पदकांसाठी निवड करण्यात आली. प्रजासत्ताक दिनी गडचिरोली येथे पोलिस मुख्यालयात पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र देवून त्यांना गौरविण्यात आले.


विलास पोरतेट हे मूळचे अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील व माओवादयाचा गड असलेल्या राजाराम (खांदला )येथील रहिवासी आहेत. विलास पोरतेट यांच्या जन्म अत्यंत गरीब परिवारात झाला. विलास हा मितभाषी, अभ्यासू, कष्टाळू स्वभावाचा असल्याने त्याने अनेक संकटावर मात करत हे यश प्राप्त केले आहे. 2007 पोलिस भरतीमध्ये शिपाई म्हणून नियुक्ती झाली. प्रशिक्षणातील उत्कृष्ट सादरीकरनामुळे 2008 मध्ये सी. 60 कमांडो, 2013 मध्ये पोलिस नाईक, 2019 मध्ये हवालदार आणि त्यानंतर 2025 मध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. आणि आज 'शौर्य ' पदकाचा मानकरी ठरला. त्याच्या यशाबद्दल पोरतेट यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.


मनामध्ये जिद्द व कुटूंबाची साथ असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीला मात देत आपले ध्येय गाठू शकतो. गरिबी त्याच्या आड येत नाही. माझ्या या यशात माझ्या कुटुंबाचे, माझे वरिष्ठ अधिकारी, सहकारी यांचे मार्गदर्शन व मी अभियानात घराबाहेर असतांना माझ्या घरच्यांची, मुलांची काळजी घेत माझ्या पाठीशी खंभीरपणे उभी असलेल्या माझ्या पत्नीचा मोलाचा वाटा आहे. - विलास पोरतेट,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !