ब्रम्हपुरी येथील रस्ते व रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम जलद गतीने व्हावे यासाठी प्रशांत डांगे यांचे आमरण उपोषण सुरू ; आज ऊपोषणाचा ४ दिवस.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी ,वडसा ,आरमोरी रस्त्याचे खोदकाम तसेच ब्रह्मपुरी - आरमोरी मार्गावरील उड्डाणपुलाचे संथ गतीने सुरू असलेले बांधकाम जलद गतीने पूर्णा करून रहदारी धारकांना रस्ता चांगला मिळावा यासाठी रिपब्लिकन पक्ष खोरीप शहराध्यक्ष तथा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता श्री. प्रशांत डांगे यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ गणराज्य दिनापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
आज आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून शासनाने अजूनही त्यांच्या उपोषणाची गंभीर दखल न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे.शासनाने जर उपोषणाची दखल घेतली नाही तर उपोषणाचे आंदोलन अधिक तीव्र केल्या जाईल असे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपोषण कर्ते प्रशांत डांगे यांनी शासनाविरुद्ध व संबंधित ठेकेदाराविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.
जोपर्यंत नागपूरवरून बांधकाम विभागाचे मुख्य वरिष्ठ अभियंता अधिकारी येत नाही आणि जलद गतीने बांधकाम पूर्ण करण्याची लेखी हमी देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पक्का आहे असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रशांत डांगे यांच्या आमरण उपोषणाला विविध राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे पुढारी व नातेवाईक मित्रपरिवार हे उपोषण स्थळाला भेट देत असून उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवित आहेत. त्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि त्या मागण्यांना पूर्ण करण्यासाठी भक्कमपणे पाठीशी संपूर्ण ताकतीनिशी उभे राहण्याचे सुतवाच भेट देणाऱ्यांनी केले आणि आपला अभिप्राय उपोषण स्थळी असलेल्या भेट पुस्तिकेत लिहिले.
दिनांक ३० जानेवारीला रस्ता रोको आंदोलन करून निद्रिस्त असलेल्या शासनाला व बांधकाम ठेकेदाराला जागे करण्यात येईल असे पद्माकर रामटेके यांनी पत्रकार परिषदेत आपले मनोगत व्यक्त त्यांना सांगितले.
प्रशांत डांगे यांच्या आमरण उपोषण स्थळाला ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि आपल्या विभागाचे तीन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उपोषण कर्त्याच्या देखरेखी साठी तैनात केले.
ब्रह्मपुरी आरोग्य विभाग हे सुद्धा प्रशांत डांगे यांच्या प्रकृती वरती बारीक लक्ष ठेवून वेळोवेळी त्यांच्या प्रकृती बद्दल चौकशी करित असून त्यांच्या आवश्यक असणाऱ्या चाचण्या करून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.उपोषण कर्ते प्रशांत डांगे यांच्या संपूर्ण मागण्यांना लवकरच यश मिळो अशी ब्रह्मपुरी व आजूबाजूच्या परिसरातील जनतेची सदिच्छा आहे.


