दिनदर्शिका प्रकाशन व उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा मूल - सावली तर्फे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय मूल येथे सर्व वार्डातील रुग्णांना फळे वाटपाचा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला. सोबतच नववर्ष 2026 दिनदशींका प्रकाशन सोहळा नगराध्यक्षा सौ.एकता समर्थ व उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ.बंडू रामटेके व डॉ. लाडे यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.
मूल तालुका शाखा संघटक धर्मेंद्र सुत्रपवार यांनी या दोन्ही स्तुत्य उपक्रमाची रूपरेषा सादर केली.नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. ऐकता समर्थ व नवनिर्वाचित नगरसेवकप्रशांत समर्थ यांचे फुल गुच्छ देऊन डॉ.बंडू रामटेके व डॉ.लाडे यांनी स्वागत केले. या प्रसंगी उपस्थित राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी राज्य पत्रकार संघाच्या लोकाभिमुख कार्यावर प्रकाश टाकला.राज्य पत्रकार संघ मुंबई च्या मूल- सावली शाखेतर्फे काढण्यात आलेल्या उपयुक्त व आकर्षक अशा "दिनदर्शिका-2026"चे प्रकाशन सर्व मान्यवर मंडळींचे हस्ते करण्यात आले.
तदनंतर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वार्डातील दाखल असलेल्या 50 वर रूग्णाना नगराध्यक्षा सौ. ऐकता समर्थ, डॉ. बंडू रामटेके,राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे,डॉ.लाडे,नगरसेवक प्रशांत समर्थ,डॉ.तिरथ उराडे,माजी न. प. उपाध्यक्ष चंद्रकांत चटारे, सामाजिक कार्यकर्ता दत्ताजी समर्थ, तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी यांचे हस्ते फळे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.राज्य पत्रकार संघाचे मूल सावली तालुका अध्यक्ष सतिश राजुरवार ,सचिव राजेंद्र वाढई, उपाध्यक्ष रोहित कामडे, सावली तालुका उपाध्यक्ष रोशन बोरकर,प्रकाश चलाख, विवेक दुयौधन, राजेंद्र सुत्रपवार, सुशांत वाळके, सतीश सुंकरवार ,जुबेद शेख,यांचेसह राज्य पत्रकार संघ मुल, सावली पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके डॉ.लाडे यांनी उपजिल्हा रूग्णालयातील सेवा, सुविधा व उपक्रम यासंबंधाने नवनिर्वाचित नगराध्यक्षा, नगरसेवक व पत्रकार मंडळींना माहिती दिली व रुग्णसेवेसाठी सहकार्य अपेक्षित ठेवून
सर्वांचे आभार मानले.
****************************
पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य व
पुण्यशील
..... नगराध्यक्षा सौ. ऐकता समर्थ
नववर्षाचे स्वागत राज्य पत्रकार संघाचे स्तुत्य उपक्रमाने होत असल्याचे मत यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. ऐकता समर्थ यांनी
व्यक्त केले. राज्य सरचिटणीस डॉ.
विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप
करण्याचे पुण्यशील कार्य माझे हस्ते
घडल्याचे समाधान व्यक्त करुन त्यांनी भविष्यातही अशा स्तुत्य उपक्रमात नेहमी सहभागी होण्याची
ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ ऐकता समर्थ यांनी उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांची आस्थेने
विचारपूस करून उपजिल्हा रुग्णालयातील निरंतर रुग्णसेवेचे
कौतुक केले. नवनिर्वाचित नगराध्यक्षा म्हणून सौ. समर्थ यांची
ही प्रथम भेट असल्याने त्यांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके
यांचेसह सर्व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. स्तुत्य व पुण्याशील उपक्रम
घडवून आणल्याबद्दल नगराध्यक्षा
सौ. एकता समर्थ व डॉ. रामटेके यांनी राज्य पत्रकार संघाचे कौतुक
करून आभार मानले.


