ने.हि.महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात आझाद हिंद सेनेचे प्रमुख, प्रखर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेची जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर व डॉ.राजेंद्र डांगे यांनी दोन्ही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी घोषणा देण्यात आल्या.
यानंतर उपस्थित डॉ धनराज खानोरकर, डॉ असलम शेख, डॉ रतन मेश्राम, डॉ योगेश ठावरी, डॉ अतुल येरपुडे,प्रा बालाजी दमकोंडवार,डॉ भीमा डांगे, डॉ कुलजित शर्मा, डॉ पद्माकर वानखडे, डॉ मिलिंद पठाडे,प्रा जयेश हजारे,प्रा मनीषा लेनगुरे,प्रा कृतिका बोरकर, दत्तू भागडकर, शशिकांत माडे व इतर सर्व कर्मचारी यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.संचालन व आभार समितीचे डॉ धनराज खानोरकर मानले. यशस्वीतेसाठी समिती सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

